सोलापुरातील कोरोना बाधितांची संख्या आता ३६०; मृतांच्या संख्येत झाली घट...!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2020 11:11 IST2020-05-16T11:09:38+5:302020-05-16T11:11:57+5:30
१४८ पैकी १३१ जणांचे अहवाल निगेटिव्ह; ११३ रूग्णांनी केली कोरोनावर मात...!

सोलापुरातील कोरोना बाधितांची संख्या आता ३६०; मृतांच्या संख्येत झाली घट...!
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात कोरोना विषाणू बाधित रूग्णांची संख्या कमी होत नसल्याचे दिसून येत आहे़ शनिवारी सकाळी नऊ वाजता जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार सोलापुरातील कोरोना बाधित रूग्णांची संख्या ३६० एवढी झाली आहे.
दरम्यान, शनिवारी सकाळी नऊच्या सुमारास शासकीय रूग्णालयाकडून १४८ अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी १७ पॉझिटिव्ह अहवाल आहेत. त्यात दहा पुरुष आणि सात महिलांचा समावेश आहे. तर १३१ निगेटिव्ह अहवाल आले आहेत. आज एकाही मृत रूग्णांची नोंद नाही.
आत्तापर्यंत ३७३४ जणांचे स्वॅब घेण्यात आले आहेत. यापैकी ते ३३७४ निगेटिव्ह तर ३६० पॉझिटिव्ह अहवाल आले आहेत. आतापर्यंत एकूण २४ जणांचा मृत्यू झालाय तर ११३ जण बरे झाले असल्याचीही माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.