शहरं
Join us  
Trending Stories
1
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
2
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
3
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
4
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
5
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
6
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
7
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
8
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
9
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
10
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
11
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
12
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
13
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
14
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
15
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
16
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
17
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
18
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
19
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

सोलापुरातील एनटीपीसी प्रकल्प बाधित शेतकरी कुटुंबाला नोकरीऐवजी पाच लाख रुपयांची मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2019 13:28 IST

सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील एनटीपीसी प्रकल्पासाठी आहेरवाडी व फताटेवाडी येथील शेतकºयांच्या जमिनी संपादित केल्या आहेत. या प्रकल्पासाठी जमिनी संपादित ...

ठळक मुद्दे दक्षिण सोलापूर तालुक्यातील एनटीपीसी प्रकल्पासाठी आहेरवाडी व फताटेवाडी येथील शेतकºयांच्या जमिनी संपादित प्रांताधिकारी कार्यालयाकडे १0 कोटींचा निधी देण्यात आला असून, आचारसंहितेपूर्वीच त्याचे वाटप सुरू

सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील एनटीपीसी प्रकल्पासाठी आहेरवाडी व फताटेवाडी येथील शेतकºयांच्या जमिनी संपादित केल्या आहेत. या प्रकल्पासाठी जमिनी संपादित केलेल्या शेतकरी कुटुंबातील एका सदस्याला नोकरी देण्याचे आश्वासन कंपनीकडून देण्यात आले होते. मात्र नोकरी देणे शक्य होणार नसल्याने प्रती कुटुंबास पाच लाख याप्रमाणे मदतनिधी देण्यात येत आहे. यासाठी दहा कोटींचा निधीही प्राप्त झाला असल्याची माहिती प्रांताधिकारी ज्योती पाटील यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली.

यावेळी पाटील म्हणाल्या, लोकसभा निवडणूक आचारसंहिता लागू होण्यापूर्वी पुनर्वसन खात्याच्या वरिष्ठ पातळीवर झालेल्या बैठकीत शेतकरी कुटुंबांना नोकरीऐवजी पाच लाख निधी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयानुसार प्रांताधिकारी कार्यालयाकडे १0 कोटींचा निधी देण्यात आला असून, आचारसंहितेपूर्वीच त्याचे वाटप सुरू करण्यात आले आहे. 

या प्रकल्पात शेती गेलेल्या ४२२ कुटुंबांना हा मदतनिधी देण्यात येत आहे. कंपनीकडून प्राप्त झालेला १० कोटींचा निधी अपुरा असून, यासाठी २१ कोटींचा निधी अपेक्षित असणार आहे. वाढीव निधीचाही प्रस्ताव कंपनीकडे पाठविण्यात येत आहे. 

प्रकल्पबाधित शेतकºयांच्या पुनर्वसनासाठी यापूर्वी प्रती एकरी अडीच लाख रुपयांचा पुनर्वसन निधी देण्याचाही निर्णय घेण्यात आला होता. या निर्णयानुसार प्रांताधिकारी कार्यालयाकडे ४७ कोटी २८ लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला होता. यापैकी ३१ कोटी ४९ लाख रुपयांचा पुनर्वसन निधी शेतकºयांना देण्यात आला आहे. उर्वरित शेतकºयांना पुनर्वसन निधी देण्यासाठी १५ कोटींचा निधी शिल्लक असल्याचेही पाटील यांनी यावेळी सांगितले. 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Collector Officeसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय