धर्मादाय कायद्याखाली नोंदणी असलेल्या रूग्णांलयाची अचानक होणार तपासणी,  समिती स्थापन करण्याचे  सहकारमंत्र्यासह जिल्हाधिकाºयांच्या सुचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2017 12:53 PM2017-12-27T12:53:14+5:302017-12-27T12:54:38+5:30

धर्मादाय कायद्याखाली नोंदणी असलेल्या रुग्णालयातून गरीब रुग्णांना मोफत वैद्यकीय उपचार दिले जातात का नाही, याची तपासणी करण्यासाठी समिती नियुक्त केली जाणार आहे. जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी आणि सोलापूर महानगरपालिकेच्या आरोग्य अधिकारी यांचा समितीत समावेश असेल.

Notice of sudden investigation of patients, who are registered under charity law, and information of co-operative and district collector | धर्मादाय कायद्याखाली नोंदणी असलेल्या रूग्णांलयाची अचानक होणार तपासणी,  समिती स्थापन करण्याचे  सहकारमंत्र्यासह जिल्हाधिकाºयांच्या सुचना

धर्मादाय कायद्याखाली नोंदणी असलेल्या रूग्णांलयाची अचानक होणार तपासणी,  समिती स्थापन करण्याचे  सहकारमंत्र्यासह जिल्हाधिकाºयांच्या सुचना

googlenewsNext
ठळक मुद्देधर्मादाय आयुक्त कार्यालयानेही या रुग्णालयांना अचानक भेटी देऊन तपास करावा, अशा सूचनाजिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी आणि सोलापूर महानगरपालिकेच्या आरोग्य अधिकारी यांचा समितीत समावेशया योजनेची अंमलबजावणी न करणाºया रुग्णालयांवर कारवाईचे अधिकार धर्मादाय आयुक्तांना आहेत


आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि २७ : धर्मादाय कायद्याखाली नोंदणी असलेल्या रुग्णालयातून गरीब रुग्णांना मोफत वैद्यकीय उपचार दिले जातात का नाही, याची तपासणी करण्यासाठी समिती नियुक्त केली जाणार आहे. जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी आणि सोलापूर महानगरपालिकेच्या आरोग्य अधिकारी यांचा समितीत समावेश असेल. त्याचबरोबर धर्मादाय आयुक्त कार्यालयानेही या रुग्णालयांना अचानक भेटी देऊन तपास करावा, अशा सूचनाही करण्यात आल्या.
सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय समितीची बैठक झाली. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी सुनील थोरवे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुमेध अणदूरकर, सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सोनिया बागडे, सहधर्मादाय आयुक्त गीतांजली कोरे आदी उपस्थित होते.
-----------------------
दर्शनी भागात फलक लावा
- सहकारमंत्री देशमुख म्हणाले की, जिल्ह्यातील सर्व धर्मादाय रुग्णालयात गरीब रुग्णांसाठी दहा टक्के राखीव खाटा ठेवण्यात येतात. याची माहिती रुग्णालयाच्या दर्शनी भागात लावणे अपेक्षित आहे. परंतु, अनेक रुग्णालये माहिती फलक लावत नाहीत. यापुढे हे फलक लावण्यात यावेत. सर्व रुग्णालयात जमा होणाºया देयकाच्या दोन टक्के रक्कमही बाजूला काढून ठेवली जाते का? त्यामधून गरीब रुग्णांवर उपचार केले जातात का, याची तपासणी केली जावी, असेही त्यांनी सांगितले. 
-----------------
या रुग्णालयांचा समावेश
- अश्विनी ग्रामीण रुग्णालय, कुंभारी. कर्मवीर औदुंबरराव पाटील ट्रस्ट, पंढरपूर. मल्लव्वाबाई वल्याळ डेंटल हॉस्पिटल, सोलापूर. अल-फैज जनरल हॉस्पिटल, सिध्देश्वर पेठ, सोलापूर. गोविंदजी रावजी आयुर्वेद रुग्णालय, सोलापूर. यशोधरा हॉस्पिटल. सिध्देश्वर कॅन्सर हॉस्पिटल. जगदाळे मामा हॉस्पिटल, बार्शी. मल्लव्वाबाई वल्याळ डेंटल हॉस्पिटल, केगाव. युगंधर हॉस्पिटल, मजरेवाडी. दत्त मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटल, बार्शी. ब्रिजमोहन फोफलिया नेत्रालय. लोकमंगल जीवक हॉस्पिटल. इंडियन कॅन्सर सोसायटी. गांधी नाथा रंगजी हॉस्पिटल. कासलीवाल हॉस्पिटल. धनराज गिरजी ट्रस्ट़ जनकल्याण हॉस्पिटल, पंढरपूर. 
------------------
तक्रारी कळवा
- या योजनेची अंमलबजावणी न करणाºया रुग्णालयांवर कारवाईचे अधिकार धर्मादाय आयुक्तांना आहेत. धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडून रुग्णालयांची तपासणी होत नाही. त्यामुळे रुग्णालयांनाही कायद्याची भीती उरलेली नाही. याबाबत जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले म्हणाले की, धर्मादाय रुग्णालयांची तीन समितीच्या माध्यमातून तपासणी केली जाते. मात्र या योजनेची अंमलबजावणी होते की नाही याची पाहणी समिती करेल. रुग्णांनीही तक्रार केल्यास संबंधित रुग्णालयांवर कारवाई होईल. 

Web Title: Notice of sudden investigation of patients, who are registered under charity law, and information of co-operative and district collector

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.