यंदा सोलापुरातील मीना बाजार नाही... खरेदी नाही.. मेरी ईद सादगी से !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2020 11:21 AM2020-05-19T11:21:27+5:302020-05-19T11:24:39+5:30

साध्या पध्दतीने ईद साजरी करण्याचा आवाहन; कोरोनाचा संसर्ग पाहता घेतला निर्णय

No Meena Bazaar in Solapur this year ... No shopping .. Merry Eid Simplicity! | यंदा सोलापुरातील मीना बाजार नाही... खरेदी नाही.. मेरी ईद सादगी से !

यंदा सोलापुरातील मीना बाजार नाही... खरेदी नाही.. मेरी ईद सादगी से !

googlenewsNext
ठळक मुद्देकोरोनाच्या लॉकडाऊनमुळे आठवडा बाजार बंद ठेवण्यात आलेरमजाननिमित्त मीना बाजारसह इतर बाजार भरणार का? याकडे लक्ष लागलेमीना बाजारबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. मात्र, यासंदर्भात पोलीस आयुक्तांसोबत चर्चा होणार

सोलापूर : कोरोनाचा लॉकडाऊन कायम आहे आणि रमजान ईद अवघ्या सहा दिवसांवर आली आहे. कोरोनाचा संसर्ग पाहता यंदा ईदनिमित्त मीना बाजार भरवू नये. लोकांनी शॉपिंग करण्याऐवजी साध्या पद्धतीने ईद साजरी करावी, असे आवाहन मुस्लीम समाजातील सामाजिक संघटना, राजकीय नेते यांच्याकडून केले जात आहे.

रमजान ईदसाठी दरवर्षी शहरातील बाजारपेठा सजलेल्या असतात. विजापूर वेस परिसरात भरणारा मीना बाजार गर्दीने गजबजलेला असतो. जिल्ह्याच्या विविध भागातील मुस्लीम बांधव या बाजारात खरेदीसाठी येतात. कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे आठवडा बाजार बंद ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे रमजाननिमित्त मीना बाजारसह इतर बाजार भरणार का? याकडे लक्ष लागले आहे. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, मनपा आयुक्त दीपक तावरे यांनी नुकतेच यासंदर्भात महापालिकेतील गटनेत्यांशी चर्चा केली. 

या बैठकीत एमआयएमचे गटनेते रियाज खरादी यांनी यंदा मीना बाजार भरवू नये. बाजार भरवला तर लोक खरेदीसाठी गर्दी करतील. फिजिकल डिस्टन्सिंगचे तीन-तेरा होतील. समाजातील काही मान्यवरांचे हेच मत असल्याचे सांगितले होते. या मताला इतर नगरसेवकांनी पाठिंबा दिला होता.
यादरम्यान मौलाना आझाद विचार मंचचे हसीब नदाफ यांनी सोशल मीडियावर ‘से नो टू ईद शॉपिंग’, ‘मेरी ईद सादगी से’ असे कॅम्पेन सुरू केले आहे. तरुणांनी या मोहिमेला प्रतिसाद दिल्याचे दिसून येते.


आम्ही प्रशासनासोबत-सलीम हिरोळी
- लॉकडाऊन हा लोकांच्या भल्यासाठी आहे. आम्ही प्रशासनासोबत आहोत. मीना बाजार पब्लिक के लिए है... मगर अब पब्लिक की जान खतरे मे है... जान है तो जहान है... कोरोना हा संसर्गजन्य आजार आहे. मीना बाजार भरला तर लोक गर्दी करतील. जे नकोय तेच होईल. त्यामुळे यंदा मीना बाजार भरवायचा नाही, असा निरोप आम्ही सर्व व्यापाºयांना पाठवत आहोत. अनेक व्यापारी याला प्रतिसाद देत आहेत, असे मीना बाजार कमिटीचे माजी अध्यक्ष सलीम हिरोळी यांनी सांगितले

मीना बाजारबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. मात्र, यासंदर्भात पोलीस आयुक्तांसोबत चर्चा होणार आहे, त्यानंतरच निर्णय होईल.
- दीपक तावरे, 
आयुक्त, महापालिका.

Web Title: No Meena Bazaar in Solapur this year ... No shopping .. Merry Eid Simplicity!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.