'उत्तर'च्या सभापती रजनी भडकुंबे यांच्या विरोधात दाखल केलेला अविश्वास ठराव अखेर मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2021 15:28 IST2021-10-22T15:24:53+5:302021-10-22T15:28:03+5:30

सोलापूर लोकमत ब्रेकिंग

The no-confidence motion against Rajni Bhadkumbe, chairman of Uttar Pradesh, was finally passed | 'उत्तर'च्या सभापती रजनी भडकुंबे यांच्या विरोधात दाखल केलेला अविश्वास ठराव अखेर मंजूर

'उत्तर'च्या सभापती रजनी भडकुंबे यांच्या विरोधात दाखल केलेला अविश्वास ठराव अखेर मंजूर

सोलापूर : उत्तर सोलापूर तालुका पंचायत समितीच्या सभापती रजनी भडकुंबे यांच्या विरोधात दाखल केलेला अविश्वास ठराव आज तीन विरुद्ध एक अशा मताने मंजूर करण्यात आला.

उत्तर सोलापूर तालुका पंचायत समितीच्या सभागृहात अविश्वास ठरावाच्या संदर्भातील सभा पीठासन अधिकारी तथा प्रांताधिकारी हेमंत निकम यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. सकाळी 11 वाजता सभेच्या कामकाजाची सुरुवात झाली. पीठासन अधिकारी निकम यांनी अविश्वास ठरावाबाबत हात उंचावून मतदान घेतले. त्यावेळी अविश्वास ठरावाच्या बाजूने तीन सदस्यांनी हात वर केले तर विरोधात एक सदस्यांनी हात वर केला. त्यामुळे भाजपच्या सदस्य संध्याराणी पवार, राष्ट्रवादीचे सदस्य जितेंद्र शीलवंत, माजी आमदार दिलीप माने गटाचे सदस्य हरिदास शिंदे या तिघांनी एकत्र येऊन दाखल केलेला अविश्वासाचा ठराव तीन विरुद्ध एक ताने मंजूर करण्यात आला.

Web Title: The no-confidence motion against Rajni Bhadkumbe, chairman of Uttar Pradesh, was finally passed