सर्पदंशामुळे नऊ वर्षाच्या मुलीचा दुदैवी मृत्यू; सोलापुरातील धक्कादायक घटना

By रवींद्र देशमुख | Updated: April 5, 2023 15:24 IST2023-04-05T15:23:43+5:302023-04-05T15:24:19+5:30

अंगणात खेळत असलेल्या नऊ वर्षाच्या मुलीचा सर्पदंशामुळे मृत्यू झाला.

nine year old girl tragically dies due to snakebite shocking incident in solapur | सर्पदंशामुळे नऊ वर्षाच्या मुलीचा दुदैवी मृत्यू; सोलापुरातील धक्कादायक घटना

सर्पदंशामुळे नऊ वर्षाच्या मुलीचा दुदैवी मृत्यू; सोलापुरातील धक्कादायक घटना

रवींद्र देशमुख, सोलापूर: अंगणात खेळत असलेल्या नऊ वर्षाच्या मुलीचा सर्पदंशामुळे मृत्यू झाला. माहेरा जफर डोंगरकर ( वय ९, रा. नई जिंदगी) असे त्या मुलीचे नाव आहे. 

माहेरा ही काही दिवसांपूर्वी आजी जवळ रहायला गेली होती. तेथे ती घरासमोर खेळत असताना तिला सापाने दंश केला. यामुळे तिला त्रास होऊ लागल्याने लगेच तिला तिच्या नातेवाईकांनी तात्काळ उपचारासाठी छत्रपती शिवाजी महाराज शासकीय रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. माहेरा ही अत्यंत गरीब कुटुंबातील मुलगी आहे. माहेरा ही इयत्ता पहिलीच्या वर्गात शिक्षण घेत होती. तिचे वडील रिक्षा चालक आहेत. घटनेची माहिती कळताच तिच्या नातेवाईकांनी शासकीय रूग्णालयात मोठी गर्दी केली होती. या घटनेची नोंद सिव्हिल पोलिस चौकीत झाली आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

Web Title: nine year old girl tragically dies due to snakebite shocking incident in solapur