शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

राज्यातील नऊ ‘एचआयव्ही’बाधित जोडप्यांचं व्हॅलेंटाईन दिनी मेळाव्यात ठरलं लग्न !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2019 14:19 IST

सोलापूर : एचआयव्ही संसर्ग झाल्यानंतर जीवनाविषयी निराश न होता. आजारातून बरे होण्याची उमेद कायम ठेऊन  १७० बाधित जोडपे मोठ्या ...

ठळक मुद्देसंकल्प युथ फाउंडेशनचा उपक्रम, राज्यस्तरीय उपक्रम, १७0 वधू -वरांची उपस्थितीया मेळाव्यासाठी बुलढाणा, नांदेड, कोल्हापूर, मुंबई, पुणे, नाशिक,चंद्रपूर, गडचिरोली याचबरोबर महाराष्ट्राच्या बाहेरीलही  युवक-युवती सहभागीया उपक्रमात नऊ जोडप्यांनी आपले जीवनसाथी निश्चित करून थोरा - मोठ्यांचे सहकार्याने विवाह निश्चित केले

सोलापूर : एचआयव्ही संसर्ग झाल्यानंतर जीवनाविषयी निराश न होता. आजारातून बरे होण्याची उमेद कायम ठेऊन  १७० बाधित जोडपे मोठ्या उत्साहाने वधू - वर मेळाव्या आले. संकल्प युथ फाऊंडेशनने खास व्हॅलेन्टाईन दिनी आयोजित केलेल्या या उपक्रमात नऊ जोडप्यांनी आपले जीवनसाथी निश्चित करून थोरा - मोठ्यांचे सहकार्याने विवाह निश्चित केले.

अवंती नगर येथील प्रसन्न बहुउद्देशीय सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या या आगळ्या वेगळ्या वधू-वर परिचय मेळाव्याचे उद्घाटन जिल्हा सरकारी वकील प्रदीपसिंह राजपूत यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला  विजापूर नाका पोलीस चौकीचे पोलीस निरीक्षक कैलास काळे,युवा उद्योजक  नितीन अरतानी, सोलापूर बार असोसिएशनचे अध्यक्ष संतोष न्हावकर,प्रसन्न नाझरे,मुख्य संयोजक अ‍ॅड. बसवराज सलगर, संस्थेचे अध्यक्ष किरण लोंढे आदी उपस्थित होते.

या मेळाव्यासाठी बुलढाणा, नांदेड, कोल्हापूर, मुंबई, पुणे, नाशिक,चंद्रपूर, गडचिरोली याचबरोबर महाराष्ट्राच्या बाहेरीलही  युवक-युवती सहभागी झाले होते. यामध्ये १२0 युवक व ५0 युवती सामील झाल्या होत्या.  या मेळाव्यातून ९ विवाह जमले आहेत. यावेळी प्रदीपसिंग राजपूत यांनी मेळाव्याचे कौतुक केले. अशा प्रकारचा मेळावा महाराष्ट्रात कुठेच भरला जात नाही.सोलापुरातील हा उपक्रम खूप महत्त्वाचा आहे. संकल्प युथ फाउंडेशन या संस्थेचे हे काम अत्यंत कौतुकास्पदच आहे असे प्रतिपादन त्यांनी केले.  

संतोष न्हावकर म्हणाले,  हे कार्य करताना आणि अशा असामान्य लोकांना एकत्र आणताना खूप अडचणींना सामोरे जावे लागत असेल,या अडचणी दूर करून संकल्प फाउंडेशनच्या टीमने केलेले काम हे खरंच कौतुकास्पद आहे असे सांगितले. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी प्रमोद खांडेकर ,नितीश फुलारी, ओंकार साठे,पूजा काटकर, श्रद्धा राऊळ, रोहित दुगाणे,सूरज भोसले,सागर देवकुळे, सोनू कसबे,आकाश धोत्रे,योगिनी दांडगे, अशपाक नदाफ आदींनी परिश्रम घेतले.

आंतरजातीय विवाह...- या वधू - वर मेळाव्यात सर्वजण जातीची उतरंड मोडून सहभागी झाले होते. जीवघेण्या आजाराने बाधित झालोे असलो तरी जगण्याची एक तरी संधी मिळेल, हा आशावाद त्यांच्या ठायी कायम होता. बंधनं कोणतीच नव्हती, जात तर त्यांच्या मनाला शिवतही नव्हती. त्यामुळे बाधितांच्या या मेळाव्यात जी नऊ लग्न ठरली. त्यातील सात जोडप्यांनी आंतरजातीय विवाह करण्याला पसंती दिली.

टॅग्स :SolapurसोलापूरHIV-AIDSएड्सmarriageलग्न