मालकाच्या मृत्यूनंतर नऊ दिवस लोटले, कुत्रा स्मशानभूमीतच थांबून...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2025 05:55 IST2025-10-17T05:54:34+5:302025-10-17T05:55:00+5:30
तानाजी पवार या शेतकऱ्याचा नऊ दिवसांपूर्वी मृत्यू झाला. ज्या स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले, तेथेच त्यांचा कुत्रा गेल्या नऊ दिवसांपासून हताशपणे बसून आहे.

मालकाच्या मृत्यूनंतर नऊ दिवस लोटले, कुत्रा स्मशानभूमीतच थांबून...
- अशोक कांबळे
लोकमत न्यूज नेटवर्क
मोहोळ (सोलापूर) : कुत्रा म्हणजे इमानदार प्राणी. त्याच्याएवढा प्रामाणिक दुसरा कुठलाही प्राणी नाही, असे म्हटले जाते. एखाद्या घरमालकाने कुत्र्याला जीव लावला तर तो आपल्या जिवाची पर्वा न करीत नाही. याचा प्रत्यय नुकताच वडवळ येथे आला.
तानाजी पवार या शेतकऱ्याचा नऊ दिवसांपूर्वी मृत्यू झाला. ज्या स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले, तेथेच त्यांचा कुत्रा गेल्या नऊ दिवसांपासून हताशपणे बसून आहे.
काहींनी सोबत नेण्याचा प्रयत्न केला पण कुत्रा तेथून जाण्यास तयार नाही. वडवळ येथील शेतकरी तानाजी सदाशिव पवार यांची जेमतेम दोन एकर शेती आहे. पत्नी, मुलासह वस्तीवर राहणाऱ्या तानाजी पवार यांचा अल्पशा आजाराने ७ ऑक्टोबर रोजी मृत्यू झाला. नातेवाइकांनी त्यांच्या पार्थिवावर वडवळ येथील
स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले.
जिवाला जीव लावणारा तानाजी पवार यांचा कुत्रा मालकाला गेले नऊ दिवस स्मशानभूमीतच बसून आहे. काहींनी त्याला सोबत घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, गेला नाही. मन विषण्ण करणारे हे चित्र आहे. वडवळ येथील नागरिकांमध्ये हा चर्चेचा विषय झाला आहे. या मुक्या प्राण्याविषयी प्रत्येक ग्रामस्थाच्या मनात दयाभाव आहे.