शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
5
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
6
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
7
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
8
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
9
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
10
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
11
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
12
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
13
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
14
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
15
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
16
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
17
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
18
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
19
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
20
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  

राष्ट्रवादीच्या रूपाली चाकणकर यांच्यासह नऊ जणांवर आचारसंहिता भंग केल्याचे गुन्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2019 17:43 IST

निवडणुक आयोगाकडे आल्या आॅनलाईन १३ तक्रारी; ग्रामीण पोलीसांनी जिल्ह्यातील सोळा हजार फलक काढले

ठळक मुद्देविधानसभेची निवडणूक घोषित झाल्यावर निवडणूक आयोगाने लागू केलेल्या आदर्श आचारसंहितेचा अंमल लागू करण्यात आलाफलक काढण्यासाठी ७२ तासांची मुदत होती. त्यात सरकारी कार्यालयांवरील फलक चोवीस तासांत उतरविले आहेतआचारसंहिता भंगाबाबत तक्रारी घेण्यासाठी सी व्हीजल अ‍ॅप उपलब्ध करण्यात आले

सोलापूर : विधानसभेची निवडणूक घोषित झाल्यानंतर आतापर्यंत आचारसंहिता भंग केल्याचे ९ गुन्हे दाखल झाले आहेत. आॅनलाईन १३ तक्रारी अर्ज आले असून, १६ हजार फलक उतरविण्यात आले आहेत. आचारसंहिता भंग केल्याबद्दल राष्ट्रवादी  काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

विधानसभेची निवडणूक घोषित झाल्यावर निवडणूक आयोगाने लागू केलेल्या आदर्श आचारसंहितेचा अंमल लागू करण्यात आला आहे. फलक काढण्यासाठी ७२ तासांची मुदत होती. त्यात सरकारी कार्यालयांवरील फलक चोवीस तासांत उतरविले आहेत. आचारसंहिता भंगाबाबत तक्रारी घेण्यासाठी सी व्हीजल अ‍ॅप उपलब्ध करण्यात आले आहे. यावरून १३ तक्रारी आल्या. यातील दहा अर्ज वगळले तर तीन तक्रारींची दखल घेण्यास गेल्यावर फलक काढण्यात येत असल्याचे दिसून आल्यावर हे अर्ज निकाली काढण्यात आले. आतापर्यंत जिल्ह्यातील १६ हजार फलक काढण्यात आले आहेत.

नामनिर्देशन अर्ज देण्यास शुक्रवारपासून सुरूवात करण्यात आली आहे. त्यानंतर ठरलेल्या कार्यक्रमानुसार छाननी, चिन्ह वाटप केले जाणार आहे. याचबरोबर सैनिकांसाठी मतपत्रिका पाठविण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. निवडणूक कामासाठी लागणाºया २१ हजार कर्मचाºयांची नियुक्ती करण्याचे काम सुरू आहे. आचारसंहिता भंगाची गंभीर तक्रार आलेली नाही. परवाना न घेता मेळावा घेणे, रिक्षावर, वाहनाच्या नंबरप्लेटवर, पाठीमागील काचेवर पक्षाचे चिन्ह अशा तक्रारी आल्या आहेत. विधानसभेसाठी खर्चाची मर्यादा २८ लाख इतकी असून, उमेदवारी अर्ज भरल्यानंतर उमेदवारांच्या खर्चाची शॅडो रजिस्टरमध्ये नोंद ठेवावी लागणार आहे. 

यांच्यावर दाखल झाले गुन्हे- मंगळवेढा येथील मंगल कार्यालयात विनापरवाना पत्रकार  परिषद घेतल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जीपच्या (क्र. एमएच ४५ए८५३६) नंबरप्लेटवर घड्याळ चिन्ह लावल्याबद्दल चालक रावसाहेब जाधव (रा. टेंभुर्णी, ता. माढा), सोलापूर बसस्थानकाजवळ एमएच १३ बीव्ही १0९ या रिक्षाच्या समोरील काचेवर वंचित बहुजन आघाडीचे नाव लिहिल्याबद्दल चालक सुदर्शन कांबळे, जुनी पोलीस लाईन येथे एमएच १३ बीएन ५५५ या गाडीच्या काचेवर कमळ व बीजेपी असे लिहिल्याबद्दल चालक हुसेन आरकुड (रा. मादनहिप्परगा, जि. गुलबर्गा), झोपडपट्टीतील महिलांना मेकअप बॉक्स वाटल्याप्रकरणी आमदार प्रणिती शिंदे व कार्यकर्ते, पद्मशाली मेळाव्याची परवानगी न घेतल्याबद्दल अशोक यनगंटी, भूपती कमटम, संग्राम दिड्डी, महापालिकेच्या महिला व बालकल्याण सभापती कुमुद अंकाराम यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल झाला  आहे.  - अनंत जगन्नाथ म्हेत्रे (वय २७, रा़ म्हेत्रे वस्ती, मु़ पो़ मंद्रुप, ता़ द़ सोलापूर ) याच्या दुचाकीवर काँग्रेस पक्षाचे चिन्ह लावण्यात आले होते, मड्डीवस्ती येथे शिवसेना पक्षाचे फलक उघडे असून त्यात उपशहरप्रमुख संताजी भोळे असे नाव होते यामुळे संताजी भोळे (वय ४६, रा़ भवानी पेठ, मड्डी वस्ती) यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत.

टॅग्स :SolapurसोलापूरNCPराष्ट्रवादी काँग्रेसPoliceपोलिसElectionनिवडणूकvidhan sabhaविधानसभा