निखिल वाघ यांचा बेस्ट रायझिंग कम्युनिकेटर ऑफ द इयर पुरस्काराने सन्मान

By संताजी शिंदे | Updated: February 27, 2024 16:15 IST2024-02-27T16:14:22+5:302024-02-27T16:15:20+5:30

दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

Nikhil Wagh honored with the Best Rising Communicator of the Year award | निखिल वाघ यांचा बेस्ट रायझिंग कम्युनिकेटर ऑफ द इयर पुरस्काराने सन्मान

निखिल वाघ यांचा बेस्ट रायझिंग कम्युनिकेटर ऑफ द इयर पुरस्काराने सन्मान

संताजी शिंदे-सोलापूर

सोलापूर : मीडिया फेटरेशन ऑफ इंडियाच्या वतीने बार्शीचे सुपूत्र व गोवा शिपयार्ड लि.मि. कंपनी मधील जनसंपर्क अधिकारी निखिल वाघ यांचा 'बेस्ट रायझिंग कम्युनिकेटर ऑप द इयर' पुरस्काराने सन्मान करण्यात आला.        

दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय मीडिया व्यक्तिमत्व डॉ.संदीप मारवाह आणि मीडिया फेडरेशन ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष अरुण शर्मा यांच्याकडून पुरस्कार प्रदान करण्यात आला. निखिल वाघ यांना १९ वर्षांचा अनुभव असून जिथे मीडिया क्षेत्रातील वृत्तपत्र आणि वृत्तवाहिनीतील कामाचा सहा वर्षांचा अनुभव आहे. गेल्या १३ वर्षांपासून त्यांनी गोवा शिपयार्ड लिमिटेडचे जनसंपर्क अधिकारी म्हणून ते महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. गोवा शिपयार्ड लिमिटेड कंपनी मधील जनसंपर्क क्षेत्रात सातत्याने केलेल्या प्रयत्नांची दखल घेऊन हा प्रतिष्ठित पुरस्कार त्यांना देण्यात आला आहे. जनसंपर्क क्षेत्रातील त्यांच्या योगदानाबद्दल, निखिल वाघ यांना यापूर्वी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते जानेवारी महिन्यात 'महागौरव २०२४ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

Web Title: Nikhil Wagh honored with the Best Rising Communicator of the Year award