कृषी पर्यटन करायलाच हवे ! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2019 01:25 PM2019-05-17T13:25:53+5:302019-05-17T13:29:12+5:30

राज्यातील कृषी पर्यटन केंद्रांना परराज्यातून व परदेशी पर्यटकांनी हजेरी लावली आहे.

Need to do agricultural tourism ! | कृषी पर्यटन करायलाच हवे ! 

कृषी पर्यटन करायलाच हवे ! 

googlenewsNext
ठळक मुद्देग्रामीण संस्कृतीचा साजबाज राखणारा हा उपक्रम आता लोकप्रिय ठरू लागलाआज महाराष्ट्रातील प्रत्येक विभागातील शेतकरी या कृषी पर्यटन उपक्रमाला जोडलेला आहे. राज्यातील ३५० शेतकरी या कृषी पर्यटन उपक्रमांमध्ये सामील होऊन आत्मसन्मानाने जगत आहेत.

कृषी पर्यटनाच्या माध्यमातून अस्सल ग्रामीण संस्कृती व परंपरा, गावरान जेवणाचा आस्वाद घेणे असो वा हिरवाईमधून बैलगाडीतून फेरफटका, ग्रामीण खेळ, चुलीवर भाजलेली हातावरची भाकरी, खर्डा, हुरडा, धपाटा, खमंग उसळ, वांग्याचे भरीत, भरलं वांगं, भेंडी, गाड्यातील दही, पशुपालन, शेततळे, फुलबागा, औषधी वनस्पती, रात्रीचं चांदणं आशा कितीतरी बाबी लोकांना अनुभवता येत आहेत.

राज्यातील कृषी पर्यटन केंद्रांना परराज्यातून व परदेशी पर्यटकांनी हजेरी लावली आहे. ग्रामीण संस्कृतीचा साजबाज राखणारा हा उपक्रम आता लोकप्रिय ठरू लागला आहे. नुकत्याच पार पडलेल्या जागतिक कृषी पर्यटनाच्या निमित्ताने यावर प्रकाशझोत टाकू यात.
सुखकारक आयुष्य जगण्यासाठी चांगला आर्थिक स्रोत निर्माण करणं आणि तो करत असताना वेळेची व कष्टाची मर्यादा ओलांडून शरीराची हेळसांड होऊन मन, बुद्धी यावर ताण पडू लागला आहे, पण ‘दुनिया की रेसमध्ये’ टिकून राहण्यासाठी प्रत्येकाला हे असे धकाधकीचे आयुष्य जगावे लागते, अशी कौटुंबिक व सामाजिक कर्तव्ये पार पाडताना माणूस स्वत:ला रिचार्ज करून ताजेतवाने करण्यासाठी पर्यटनाची जोड देऊ लागला आहे. 

आरोग्य जपण्यासाठी योगा, मेडिटेशन, सेंद्रिय विषमुक्त सात्विक अन्नाची गरज भासू लागली आणि अशातूनच आज दहा वर्षे सतत कार्यरत असलेल्या महाराष्ट्र राज्य कृषी आणि ग्रामीण पर्यटन सहकारी महासंघाने कृषी पर्यटनाचे जाळे संपूर्ण महाराष्ट्रभर पसरले आहे. पर्यटनातून फक्त अर्थार्जन हे उद्दिष्ट न ठेवता प्रगतीपथावरील शेती, नवनवीन शेती प्रयोग, सेंद्रिय अन्नधान्याची, भाजीपाला, फळे यांची उपलब्धता, पर्यावरण पूरक वातावरण निर्मिती,वृक्ष लागवड व संवर्धन, एकत्रित कौटुंबिक आर्थिक स्रोत निर्मिती अशी अनेक उद्दिष्टे या कृषी पर्यटन उपक्रमातून राबवली गेली.

आज महाराष्ट्रातील प्रत्येक विभागातील शेतकरी या कृषी पर्यटन उपक्रमाला जोडलेला आहे. कृषी पर्यटनाचे सरकारकडे एक निश्चित धोरण मंजुरीस अडकलेले आहे आजपर्यंत सरकारकडून केंद्र उभारणे किंवा पर्यटन केंद्र चालविण्यास येणाºया अडचणीवर मात करण्यासाठी एकही रुपया तरतूद नाही. परवाच झालेल्या जागतिक कृषी पर्यटन दिनानिमित्त आम्हाला सांगण्यास अभिमान वाटतो की अशा स्थितीतही आज रोजी संपूर्ण राज्यातील ३५० शेतकरी या कृषी पर्यटन उपक्रमांमध्ये सामील होऊन आत्मसन्मानाने जगत आहेत. संपूर्ण राज्यांतर्गत होणाºया स्मार्ट सिटी प्रोजेक्टच्या बदलांप्रमाणेच अनेक कृषी पर्यटन केंद्रांनी कात टाकली आहे.

एकदा आलेला पर्यटक वारंवार त्या केंद्रावर भेट देण्यास यावा यासाठी केंद्र  नूतनीकरण, स्वच्छता, करमणुकीची साधने, सात्त्विक व स्वादिष्ट भोजन, उत्कृष्ट आदरातिथ्य याबाबत केंद्रचालक अत्यंत बारकाईने लक्ष देत आहेत आणि म्हणूनच आजपर्यंत दहा वर्षांत राज्यातील साडेतीनशे पर्यटन केंद्रांवर येणाºया पर्यटकांची संख्या ७ लाखांवर गेली आहे. पर्यटनाचा व्यवसाय शेतकºयांसाठी आर्थिक आधार ठरतोय. विविध ठिकाणातील देवदेवतांच्या जत्रा, उरूस यासाठी येणारा भाविक वर्ग कृषी पर्यटन ठिकाणी मुक्कामाचा पर्याय निवडतोय.

शहरातील व्यस्त जीवनपद्धतीतून वेळ काढून शांत ठिकाणी जाऊन मनस्वी आनंद घेण्याची आवड अनेकांना असते. त्यातूनच कृषी पर्यटन प्रकार रुजत गेला. अत्यंत कष्ट करूनही शेतकºयांच्या वाट्याला फारसा नफा येत नाही. त्यातूनच शेतकºयांना कूषीपूरक व्यवसायाची गरज वाटू लागली. शेतीला कृषी पर्यटनासारख्या जोड व्यवसायाची साथ मिळाल्यास त्यांच्या उत्पादनात भर पडू शकते, या उद्देशाने महाराष्टÑ राज्य कृषी पर्यटन विकास महामंडळ व महाराष्टÑ राज्य कृषी व ग्रामीण पर्यटन सहकारी महासंघामार्फत कृषी पर्यटनाला चालना देण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. सोलापूर जिल्ह्यामधील ऐतिहासिक व धार्मिक वारसा कृषी पर्यटनाच्या जोडीने बळकट करण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. लवकरच तो सिद्धीस जाईल.
- सोनाली जाधव-मस्के
(लेखिका राज्य कृषी व ग्रामीण पर्यटन सहकारी महासंघाच्या संचालिका आहेत)

Web Title: Need to do agricultural tourism !

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.