राष्ट्रवादी पवार गटाचे शहराध्यक्ष भारत जाधव यांचा राजीनामा

By राकेश कदम | Updated: February 3, 2024 16:44 IST2024-02-03T16:43:25+5:302024-02-03T16:44:24+5:30

नाना काळेंच्या नावाची घाेषणा लवकरच.

ncp sharad pawar group city president bharat jadhav resigns | राष्ट्रवादी पवार गटाचे शहराध्यक्ष भारत जाधव यांचा राजीनामा

राष्ट्रवादी पवार गटाचे शहराध्यक्ष भारत जाधव यांचा राजीनामा

राकेश कदम, साेलापूर: राष्ट्रवादी काॅंग्रेस शरद पवार गटाचे शहराध्यक्ष भारत जाधव यांनी शनिवारी दुपारी पुण्यात शरद पवार यांच्याकडे राजीनामा साेपविला. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी हा राजीनामा मंजूर केला. प्रकृतीच्या कारणास्तव राजीनामा दिल्याचे जाधव यांनी ‘लाेकमत’ला सांगितले. नवे शहराध्यक्ष म्हणून माजी उपमहापाैर नाना काळे यांची निवड हाेण्याची शक्यता आहे.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या महाविद्यालयीन जीवनापासून साेबत असलेला साेलापुरातील नेता म्हणून भारत जाधव यांची ओळख आहे. जून २०१५ मध्ये जाधव यांनी शहराध्यक्षपदी निवड झाली हाेती. जाधव यांना हटविण्याचे प्रयत्न अनेकदा झाले. मात्र शरद पवार हे जाधव यांच्या बाजूनेच उभे राहिल्याचे दिसून आले. राष्ट्रवादी काॅंग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर जाधव यांनी शरद पवार यांच्या बाजूनेच राहण्याचा निर्णय घेतला. मात्र या फुटीनंतर राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नव्या व्यक्तीकडे देण्यात यावे यासाठी एक गट सक्रिय झाला. दरम्यान, भारत जाधव यांनी शनिवारी पुण्यात शरद पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भेट घेतली. पवारांकडे राजीनामा साेपविला. प्रदेशाध्यक्षांनी हा राजीनामा मंजूर केल्याचे जाधव यांनी सांगितले. पवार गटाने शहराध्यक्षपदासाठी माजी उपमहापाैर नाना काळे यांचे नाव निश्चित केले आहे. दाेन दिवसांत ही निवड हाेण्याची शक्यता आहे.

मी प्रकृतीच्या कारणास्वत राजीनामा दिला आहे. आता संघटनेला नवा माणूस मिळायला हवा अशी माझीही भावना आहे. मी पदावर नसलाे तरी शरद पवार आणि कुटुंबीयांसाेबत राहीन. पवार कुटुंबीयांवर हाेणाऱ्या टीकेला सडेताेड उत्तर द्यायला मी तयार आहे. - भारत जाधव.

Web Title: ncp sharad pawar group city president bharat jadhav resigns