सोलापुरातील संमेलनातील नाट्यघंटा बीडकडे सुपुर्द

By शीतलकुमार कांबळे | Updated: January 28, 2024 15:48 IST2024-01-28T15:48:08+5:302024-01-28T15:48:55+5:30

पुढील नाट्यसंमेलन आता बीडमध्ये : ४ फेब्रुवारीपासून सुरुवात.

natyaghanta from the meeting in solapur handed over to beed | सोलापुरातील संमेलनातील नाट्यघंटा बीडकडे सुपुर्द

सोलापुरातील संमेलनातील नाट्यघंटा बीडकडे सुपुर्द

शीतलकुमार कांबळे, सोलापूर : नाट्य संमेलनाचे हे शंभरावे वर्ष आहे. त्यानिमित्ताने राज्यात सहा ठिकाणी संमेलन घेण्यात येत आहे. सोलापुरात २७ व २८ जानेवारी रोजी नाट्यसंमेलन झाले. आता पुढील नाट्यसंमेलन हे ४ फेब्रुवारी रोजी बीड येथे होणार आहे.

नॉर्थकोट येथील नाट्यसंमेलनाच्या मुख्यरंगमंचावर सोलापुरातील नाट्य संमेलनाचा समारोप झाला. त्यावेळी पालकमंत्री व संमेलनाचे स्वागताध्यक्ष व कार्याध्यक्ष प्रकाश यलगुलवार यांच्या हस्ते बीडच्या दीपा क्षीरसागर यांना नटराजाची मुर्ती व नाट्यघंटा देण्यात आली. तसेच पुढील संमेलन हे बीडमध्ये होणार असल्याचे जाहीर केले. दिपा क्षीरसागर यांच्या समितीतील सदस्यांनी त्यावेळी नाट्यघंटा वाजविली.

मार्गदर्शन करताना स्वागताध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले, ज्या ठिकाणी ही नटराजाची मुर्ती व नाट्यघंटा बीडमध्ये जात आहे. तिथे संमेलमन अतिशय यशस्वी होईल, अशी माझी खात्री आहे. सोलापुरात झालेल्या संमेलनापेक्षा बीडचे संमेलन उत्कृष्ट व्हावे या शुभेच्छा.

Web Title: natyaghanta from the meeting in solapur handed over to beed

टॅग्स :Natakनाटक