शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
2
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
3
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
4
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
5
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
6
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
7
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
8
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
9
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
10
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
11
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
12
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
13
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
14
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
15
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
16
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
17
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
18
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
19
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
20
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...

‘म्होरक्या’च्या दिग्दर्शकाने पोस्टमनकडून स्वीकारला अखेर राष्ट्रीय पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2018 10:54 AM

अमर देवकर गहिवरले : पोस्टमनला पूर्णपोशाख देऊन व्यक्त केला आनंद

ठळक मुद्देपुरस्कार न स्वीकारलेल्या सर्व कलावंतांना भारत सरकारने पुरस्कार पोस्टाने पाठविलेअखेर पोस्टाकडून पाठविलेला पुरस्कार पोस्टमनकडून स्वीकारलापुरस्कार मिळाल्याचा आनंद म्हणून देवकर यांनी त्याचा पूर्णपोशाख देऊन सन्मान केला

सोलापूर/बार्शी : ‘म्होरक्या’ या चित्रपटाला दोन राष्टÑीय पुरस्कार मिळूनही तो राष्टÑपतींच्या हस्ते प्रदान न झाल्याने ६५ व्या राष्टÑीय चित्रपट पुरस्कारावर बहिष्कार घालणारे या चित्रपटाचे दिग्दर्शक अमर देवकर यांनी गुरुवारी अखेर पोस्टाकडून पाठविलेला पुरस्कार पोस्टमनकडून स्वीकारला. पुरस्कार मिळाल्याचा आनंद म्हणून देवकर यांनी त्याचा पूर्णपोशाख देऊन सन्मान केला.

हा ६५ वा राष्टÑीय चित्रपट पुरस्कार समारंभ २ मे रोजी दिल्लीमध्ये आयोजित करण्यात आला होता. राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कारप्राप्त विजेत्यांचा सन्मान होणार होता. मात्र राष्टÑपतींना महत्त्वाचे काम निघाल्याने त्यांनी केवळ एक तासाचाच वेळ या समारंभाला दिला होता. त्यामुळे पुरस्कार राष्टÑपतींऐवजी तत्कालीन माहिती व प्रसारण मंत्री स्मृती इराणी यांच्या हस्ते वितरित केले जातील, असे ऐनवेळी जाहीर झाल्यामुळे अनेकांनी हा पुरस्कार स्वीकारण्यास नकार दिला होता.

मराठी चित्रपट ‘म्होरक्या’ला दोन पुरस्कार जाहीर झाले होते. या चित्रपटाचे दिग्दर्शक अमर देवकर यांचाही यात समावेश होता. पुरस्कार न स्वीकारणाºयांमध्ये तेसुद्धा आघाडीवर होते. त्यावेळी पुरस्कार न स्वीकारलेल्या सर्व कलावंतांना भारत सरकारने पुरस्कार पोस्टाने पाठविले. यात अमर देवकर यांचाही समावेश होता. बुधवारी दुपारी बार्शी येथील शिवाजीनगर परिसरातील त्यांच्या निवासस्थानी पोस्टमन राहुल पवार यांनी जाऊन पुरस्काराचे टपाल सुपूर्द केले. भारतातील सर्वोच्च समजला जाणारा पुरस्कार टपालाच्या माध्यमातून दारी आल्याने देवकर गहिवरले. टपालातून आलेले पार्सल उघल्यावर त्यांना या पुरस्काराचे दर्शन झाले. या आनंदात पुरस्कार घरपोच करणारे पोस्टमन राहुल पवार यांचा पूर्णपोशाख देऊन सन्मान केला.

इफ्फीमध्ये ‘म्होरक्या’ डावलल्याची खंतयासंदर्भात माध्यमांजवळ व्यक्त केलेल्या प्रतिक्रियेतून गोवा येथे सुरू असलेल्या भारतीय आंतरराष्टÑीय चित्रपट महोत्सवात ‘म्होरक्या’ला डावलले गेल्याची खंत अमर देवकर यांनी व्यक्त केली. भारतीय समाजवादी-लोकशाहीच्या पहिल्या राज्यकर्त्या स्तंभाबद्दल भाष्य करणारा हा चित्रपट आहे. २०१९ च्या गणतंत्राचे औचित्य साधून महाराष्ट्रभर हा चित्रपट प्रदर्शित होईल, असे त्यांनी सांगितले.

राष्टÑीय चित्रपट पुरस्कार हा भारतातील सर्वोच्च पुरस्कार आहे. त्याचा सन्मान करणे हे आपले कर्तव्य होते. या पुरस्काराचा सन्मान हा सर्व भारतीय नागरिकांचा सन्मान आहे. तो पाळण्याचा आपण प्रामाणिकपणे प्रयत्न केला. कळत नकळत आपला सन्मान करणाºया पोस्टमनच्या शुभेच्छांमुळे त्याचा पूर्णपोशाख देऊन सन्मान करणे, हा माझ्या पाहुणचाराचा भाग होता. कदाचित राष्ट्रपती पुरस्कार देणाºयांनी ते करायला हवे होते.- अमर देवकर, दिग्दर्शक, म्होरक्या

टॅग्स :SolapurसोलापूरFilmfare Awardफिल्मफेअर अवॉर्ड