मंगळवेढ्याच्या अंकुश पडवळेंना राष्ट्रीय कृषी पुरस्कार; भारतीय कृषी अनुसंधान परिषेदेची घोषणा

By Appasaheb.patil | Published: February 24, 2023 06:53 PM2023-02-24T18:53:36+5:302023-02-24T18:53:47+5:30

भारत सरकारच्या कृषी व किसान कल्याण मंत्रालयाच्या वतीने दर वर्षी असे पुरस्कार देशभरातील नाविण्यपूर्ण व शेतकऱ्यांना दिशादर्शक काम करणाऱ्या शेतकऱ्यांना देण्यात येतो.

National Agriculture Award to Ankush Padwala of Mangalvedha; Announcement of Indian Council of Agricultural Research | मंगळवेढ्याच्या अंकुश पडवळेंना राष्ट्रीय कृषी पुरस्कार; भारतीय कृषी अनुसंधान परिषेदेची घोषणा

मंगळवेढ्याच्या अंकुश पडवळेंना राष्ट्रीय कृषी पुरस्कार; भारतीय कृषी अनुसंधान परिषेदेची घोषणा

googlenewsNext

सोलापूर - भारत सरकारच्या केंद्रीय कृषी व किसान कल्याण मंत्रालयाच्या वतीने भारतीय कृषी अनुसंधान परिषद व भारतीय कृषी संशोधन संस्था यांच्या तर्फे देण्यात येणारा "राष्ट्रीय नाविण्यपूर्ण शेतकरी पुरस्कार- २०२३" हा पुरस्कार महा ऑरगॕनिक ॲन्ड रेश्युड्युफ्री फार्मर्स असोशिएशन चे अध्यक्ष  कृषिभूषण अंकुश पडवळे (मंगळवेढा, जि, सोलापूर) यांना  जाहिर करण्यात आला आहे.  

भारत सरकारच्या कृषी व किसान कल्याण मंत्रालयाच्या वतीने दर वर्षी असे पुरस्कार देशभरातील नाविण्यपूर्ण व शेतकऱ्यांना दिशादर्शक काम करणाऱ्या शेतकऱ्यांना देण्यात येतो.  यापूर्वी ही पडवळे यांना केंद्र सरकार, राज्य सरकार व विविध स्वयंसेवी संस्था कडून विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

पडवळे हे गटशेती, सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सतत मार्गदर्शन व सहकार्य करित असतात. तसेच शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न ते केंद्र व राज्य सरकार यांच्या कडे अभ्यासपूर्ण पणे मांडतात. त्यांच्या या कामाचीच दखल घेऊन केंद्र सरकारने त्यांना हा राष्ट्रीय कृषी पुरस्कार जाहिर केला आहे. सदर पुरस्कार पुसा संस्थेच्या मेळावा ग्राऊंड वर दि. २ ते ४  मार्च दरम्यान होणाऱ्या पुसा कृषी विज्ञान मेळाव्यात ४ मार्च ला केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर व केंद्रीय कृषी राज्यमंत्री  कैलाश चौधरी यांच्या हस्ते विशेष कार्यक्रमात प्रदान करण्यात येणार आहे.

Web Title: National Agriculture Award to Ankush Padwala of Mangalvedha; Announcement of Indian Council of Agricultural Research

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.