नरेंद्र पाटील म्हणाले; राज्यात पुन्हा पहाटेचा शपथ विधी होईल की दुपारचा ते सांगता येत नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 12:58 IST2021-03-24T12:48:34+5:302021-03-24T12:58:32+5:30

नरेंद्र पाटील : गुंतागुंत काय आहे हे वरच्या पातळीवर माहित

Narendra Patil said; The state will again have a morning swearing-in ceremony that cannot be said at noon | नरेंद्र पाटील म्हणाले; राज्यात पुन्हा पहाटेचा शपथ विधी होईल की दुपारचा ते सांगता येत नाही

नरेंद्र पाटील म्हणाले; राज्यात पुन्हा पहाटेचा शपथ विधी होईल की दुपारचा ते सांगता येत नाही

सोलापूर - राज्यातील राजकीय वातावरण अस्थिर आहे. गुंतागुंत काय आहे हे वरच्या पातळीवर माहित आहे. राज्यात पुन्हा पहाटेचा शपथविधी होईल की दुपारचा होईल हे सांगता येत नाही असे विधान अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी केले.

 एका कार्यक्रमानिमित्त नरेंद्र पाटील बुधवारी सोलापुरात आले आहेत. पाटील म्हणाले, काही दिवसांपूर्वी माझी आणि खासदार उदयनराजे यांची रस्त्यात भेट झाली. त्यावेळी आपले साहेब पुन्हा मुख्यमंत्री होणार असे मी बोलून गेलो. राज्यात गेल्या सहा महिन्यात काही जणांच्या हत्या या आत्महत्या दाखविण्याचा प्रयत्न झाला. सचिन वाजे प्रकरण समोर आले. विरोधी पक्ष नेता म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी सरकारला धारेवर धरले आहे. पुढे काय होणार हे तेच सांगू शकतील, असेही पाटील म्हणाले.

Web Title: Narendra Patil said; The state will again have a morning swearing-in ceremony that cannot be said at noon