शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

शिक्षण विभागाच्या संकेतस्थळावर मुख्यमंत्री म्हणून फडणवीसांचे नाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2020 10:54 IST

राज्याच्या शिक्षण विभागाचे भाजपप्रेम कमी होईना; संकेतस्थळ अपडेट करण्यात महाविकास आघाडीचे दुर्लक्ष

ठळक मुद्देसत्तापालट होऊनही शिक्षण विभाग हा भाजप प्रेमातून बाहेर पडलेला नाहीराज्यात सत्तापालट झाले तरी शिक्षण विभाग अनभिज्ञ आहेशिक्षणमंत्री म्हणून विनोद तावडे यांची माहिती दाखवली जात आहे

रुपेश हेळवे 

सोलापूर : सर्वांना शिक्षणाचे डोस पाजणाºया शिक्षण विभागालाच सामान्यज्ञान शिक्षणाचे डोस पाजवण्याची गरज आहे़ कारण माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या संकेत स्थळावर अद्यापही मुख्यमंत्री म्हणून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती झळकत आहे. यामुळे शिक्षण विभागाचे अजूनही भाजपप्रेम कमी न झाल्याचे चित्र दिसत आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांच्या संकेतस्थळावर अद्यापपर्यंत जुनीच माहिती आहे़ ही माहिती वेळोवेळी अपडेट करण्याची गरज असतानाही अद्यापपर्यंत ही माहिती अपडेट करण्यात आली नाही़ शिक्षण विभागाला मुख्यमंत्री, शिक्षणमंत्री कोण आहे, हे माहीत नसेल तर ही गंभीर बाबच.

यामुळे सत्तापालट होऊनही शिक्षण विभाग हा भाजप प्रेमातून बाहेर पडलेला नाही राज्यात सत्तापालट होऊन आघाडी सरकारची सत्ता स्थापन झाली असून, आता राज्याचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे आहेत़ राज्यात सत्तापालट झाले तरी शिक्षण विभाग अनभिज्ञ आहे़ महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या संकेतस्थळावर आजही मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांची माहिती दाखवली जात आहे़ याचबरोबर शिक्षणमंत्री म्हणून विनोद तावडे यांची माहिती दाखवली जात आहे़ तसेच आयुक्त, सचिवपदीही जुन्याच अधिकाºयांची माहिती आहे.

संकेतस्थळावरील माहिती अपडेट करण्यासाठी मी कर्मचाºयांना सांगितले आहे़ लवकरच त्यात बदल दिसून येईल़ - वर्षा गायकवाड, शिक्षणमंत्री, महाराष्ट्र राज्य

टॅग्स :SolapurसोलापूरEducationशिक्षणSchoolशाळाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसUddhav Thackerayउद्धव ठाकरे