शिक्षण विभागाच्या संकेतस्थळावर मुख्यमंत्री म्हणून फडणवीसांचे नाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2020 10:46 AM2020-02-13T10:46:03+5:302020-02-13T10:54:14+5:30

राज्याच्या शिक्षण विभागाचे भाजपप्रेम कमी होईना; संकेतस्थळ अपडेट करण्यात महाविकास आघाडीचे दुर्लक्ष

Name of Fadnavis as Chief Minister on the website of Education Department | शिक्षण विभागाच्या संकेतस्थळावर मुख्यमंत्री म्हणून फडणवीसांचे नाव

शिक्षण विभागाच्या संकेतस्थळावर मुख्यमंत्री म्हणून फडणवीसांचे नाव

googlenewsNext
ठळक मुद्देसत्तापालट होऊनही शिक्षण विभाग हा भाजप प्रेमातून बाहेर पडलेला नाहीराज्यात सत्तापालट झाले तरी शिक्षण विभाग अनभिज्ञ आहेशिक्षणमंत्री म्हणून विनोद तावडे यांची माहिती दाखवली जात आहे

रुपेश हेळवे 

सोलापूर : सर्वांना शिक्षणाचे डोस पाजणाºया शिक्षण विभागालाच सामान्यज्ञान शिक्षणाचे डोस पाजवण्याची गरज आहे़ कारण माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या संकेत स्थळावर अद्यापही मुख्यमंत्री म्हणून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती झळकत आहे. यामुळे शिक्षण विभागाचे अजूनही भाजपप्रेम कमी न झाल्याचे चित्र दिसत आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांच्या संकेतस्थळावर अद्यापपर्यंत जुनीच माहिती आहे़ ही माहिती वेळोवेळी अपडेट करण्याची गरज असतानाही अद्यापपर्यंत ही माहिती अपडेट करण्यात आली नाही़ शिक्षण विभागाला मुख्यमंत्री, शिक्षणमंत्री कोण आहे, हे माहीत नसेल तर ही गंभीर बाबच.

यामुळे सत्तापालट होऊनही शिक्षण विभाग हा भाजप प्रेमातून बाहेर पडलेला नाही राज्यात सत्तापालट होऊन आघाडी सरकारची सत्ता स्थापन झाली असून, आता राज्याचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे आहेत़ राज्यात सत्तापालट झाले तरी शिक्षण विभाग अनभिज्ञ आहे़ 
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या संकेतस्थळावर आजही मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांची माहिती दाखवली जात आहे़ याचबरोबर शिक्षणमंत्री म्हणून विनोद तावडे यांची माहिती दाखवली जात आहे़ तसेच आयुक्त, सचिवपदीही जुन्याच अधिकाºयांची माहिती आहे.

संकेतस्थळावरील माहिती अपडेट करण्यासाठी मी कर्मचाºयांना सांगितले आहे़ लवकरच त्यात बदल दिसून येईल़ 
- वर्षा गायकवाड, शिक्षणमंत्री, महाराष्ट्र राज्य

Web Title: Name of Fadnavis as Chief Minister on the website of Education Department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.