नायडू ट्रॉफीचा क्रिकेट सामना सोलापुरात; दोन्ही संघ आज दाखल होणार

By Appasaheb.patil | Updated: December 29, 2022 12:35 IST2022-12-29T12:35:04+5:302022-12-29T12:35:31+5:30

महाराष्ट्र व गोवा या दोन्ही संघातील खेळाडू आज सोलापुरात दाखल होणार आहेत. 

Naidu Trophy cricket match in Solapur Both teams will enter today | नायडू ट्रॉफीचा क्रिकेट सामना सोलापुरात; दोन्ही संघ आज दाखल होणार

नायडू ट्रॉफीचा क्रिकेट सामना सोलापुरात; दोन्ही संघ आज दाखल होणार

सोलापूर : स्मार्ट सिटीच्या माध्यमातून नूतनीकरण झालेल्या इंदिरा गांधी स्टेडियम (पार्क मैदान) वर नव्या वर्षात १ ते ४ जानेवारी या कालावधीत २५ वर्षांखालील महाराष्ट्र विरुद्ध गोवा कर्नल सी. के. नायडू ट्रॉफी स्पर्धेचे आयोजन भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे. महाराष्ट्र व गोवा या दोन्ही संघातील खेळाडू आज सोलापुरात दाखल होणार आहेत. 

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या वतीने सोलापूर डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशनला १९ वर्षांखालील कुचबिहार ट्रॉफी महाराष्ट्र विरुद्ध सिक्कीम स्पर्धा यशस्वीपणे आयोजित केली होती. स्मार्ट सिटी तसेच सोलापूर महानगरपालिकेच्या सहकार्याने मैदानाची निगा, व्यवस्थापन तसेच जिल्हा संघटनेचे आयोजन पाहून पुनश्च एकदा सोलापूरला ही संधी मिळाली असल्याचे जिल्हा क्रिकेट संघटनेचे सेक्रेटरी चंद्रकांत रेम्बुर्स यांनी सांगितले.

या स्पर्धेचे नियोजन करण्यासाठी संघटनेचे सर्व पदाधिकारी परिश्रम घेत आहेत. दोन्ही संघ लवकरच शहरात दाखल होणार आहेत. या दोन्ही संघामध्ये अनेक रणजी खेळाडू खेळणार आहेत, तरी आपल्या सर्व क्रिकेट प्रेमींनी, खेळाडूंनी या संधीचा पुरेपूर आनंद घ्यावा, असे आवाहन संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.

Web Title: Naidu Trophy cricket match in Solapur Both teams will enter today