माझी आई घरी एकटीच आहे; तिला किराणा बाजार पोहोचवता येईल काय ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2020 21:44 IST2020-03-30T21:41:36+5:302020-03-30T21:44:22+5:30
आमदार राम सातपुते यांना नागालँडमधील जवानाचा मॅसेज; आमदारांनी कार्यकर्त्यांमार्फत पोहोचवला किराणा बाजार

माझी आई घरी एकटीच आहे; तिला किराणा बाजार पोहोचवता येईल काय ?
ठळक मुद्देसोलापूर जिल्ह्यात संचारबंदीची कडक अंमलबजावणी सुरूअत्यावश्यक सेवा वगळता जिल्ह्यातील सर्व दुकाने बंदकोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सोलापूर जिल्हा प्रशासन सज्ज
माळशिरस : भारतीय सैन्यात कार्यरत असलेला चांदापुरी (ता .माळशिरस ) येथील जवान अमोल सातपुते यांनी माळशिरसचे आमदार राम सातपुते यांना मेसेज दिला की गावी वृद्ध आई एकटीच आहे ती कुठेही जाऊ शकत नसल्यामुळे तिला किराणा बाजार नाही. तरी आपण आपल्या कार्यकर्त्यांमार्फत तिच्यापर्यंत किराणा बाजार पोहोचू शकाल काय ? असा मेसेज पाठवला.
यानंतर आमदार सातपुते यांनी तातडीने संबंधित जवानाच्या घरी भाजपाच्या कार्यकर्त्यांमार्फत किराणा बाजार पोहोच केला. अडचणीत असणाऱ्या लोकांनी घाबरून न जाता तातडीने प्रशासनाची संपर्क साधावा संदेश त्यांनी आमदार सातपुते दिला.