शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांवर माझं खूप प्रेम, 'त्या' वक्तव्याचा विपर्यास केल्याचं राज्यमंत्र्यांकडून स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2021 17:23 IST

सोलापूरातील एका कार्यक्रमात आनंद चंदनशिवे यांनी पालकमंत्र्यांचे भरभरुन कौतुक केलं. चंदनशिवे यांनी त्यांना मुख्यमंत्री व्हा असे म्हणत त्‍यांचं कौतुक केले.

ठळक मुद्देसोलापुरातील शिवसैनिकांचा रोष पाहता दत्तात्रय भरणे यांनी देखील तात्काळ दिलगिरी व्यक्त करत स्पष्टीकरणही दिले आहे. तसेच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला, असे ते म्हणाले. 

सोलापूर : राज्यमंत्री आणि सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी एका कार्यक्रमात बोलण्याच्या ओघात केलेल्या वक्तव्याची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. एका उद्यानाच्या कामासाठी निधी उपलब्ध करुन देण्यासंदर्भात 'मुख्यमंत्र्यांचं मरु द्या, जाऊ द्या' असं दत्तात्रय भरणे यांनी म्हटलं. त्यानंतर, सोलापुरातील शिवसैनिकांचा रोष पाहता दत्तात्रय भरणे यांनी देखील तात्काळ दिलगिरी व्यक्त करत स्पष्टीकरणही दिले आहे. तसेच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला, असे ते म्हणाले. 

सोलापूरातील एका कार्यक्रमात आनंद चंदनशिवे यांनी पालकमंत्र्यांचे भरभरुन कौतुक केलं. चंदनशिवे यांनी त्यांना मुख्यमंत्री व्हा असे म्हणत त्‍यांचं कौतुक केले. त्यानंतर पालकमंत्री भरणे यांनी बोलताना, दादा मला खूप काही मिळालं आहे. तुम्हाला काय द्यायचाय तो आशीर्वाद माझ्या अजितदादांना द्या असे म्हटले. दरम्यान, महापौरांनी निधीसंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या नावाचा उल्लेख केला. त्यावेळी, मुख्यमंत्र्यांच जाऊ द्या, मरु द्या असे वादग्रस्त वक्तव्य केले. त्यानंतर, पुढे सारवासारव करत, आपण मुख्यमंत्र्यांकडून मोठा निधी घेऊ, असेही ते म्हणाले. मात्र, त्यावरुन, जिल्ह्यातील शिवसैनिक आणि स्थानिक नेत्यांनी पालकमंत्री भरणेंना फैलावर घेतले होते. याबाबतचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर, भरणे यांनी व्हिडिओच्या माध्यमातून दिलगिरी व्यक्त केली आहे.  मुख्यमंत्र्यांविषयी विधान अवधानाने झाले. त्याचा विपर्यास करु नये असे सांगत मंत्री भरणे यांनी दिलगिरी व्यक्त केली. शिवसैनिकांनीच हा व्हिडिओ सोशल मीडियात शेअर केला आहे. त्यामध्ये, उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीचे नेते आहेत, आमचे सर्वांचे नेते आहेत. माझे त्यांच्यावर खूप प्रेम आहे. राज्याचे मुख्यमंत्री म्हणून त्यांचं कामही खूप चांगलंय, असे म्हणत भरणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं कौतुक करत, आपल्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आल्याचे म्हटले आहे.  

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाSolapurसोलापूरChief Ministerमुख्यमंत्री