नुपूर शर्मा अन् नवीन कुमार जिंदाल विरोधात सोलापुरातील मुस्लिम समाज आक्रमक 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2022 11:10 IST2022-06-09T11:07:53+5:302022-06-09T11:10:02+5:30

नुपूर शर्मा आणि नवीन कुमार जिंदाल यावर कारवाई न झाल्यास सोलापुरात मोठं आंदोलन करण्याचा इशारा मुस्लिम समाजाने दिला. 

Muslim community in Solapur is aggressive against Nupur Sharma and Naveen Kumar Jindal |  नुपूर शर्मा अन् नवीन कुमार जिंदाल विरोधात सोलापुरातील मुस्लिम समाज आक्रमक 

 नुपूर शर्मा अन् नवीन कुमार जिंदाल विरोधात सोलापुरातील मुस्लिम समाज आक्रमक 

सोलापूर- भाजपच्या  नुपुर शर्मा  आणि नवीन कुमार जिंदाल यांनी प्रेषित मोहम्मद पैगंबर  यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्यामुळे मुस्लिम समाज आक्रमक झालेला पाहायला मिळाला. सोलापुरातील मुस्लिम समाजातील वेगवेगळ्या संस्था आणि संघटनांनी निषेध या वक्ताव्याचा नोंदवला.

तसेच नुपूर शर्मा आणि नवीन जिंदाल यांच्यावर देशद्रोहाचा खटला दाखल करण्यात यावा, अशी मागणी या संस्था आणि संघटनांच्यावतीने करण्यात आली. यासंदर्भात जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देखील देण्यात आले. नुपूर शर्मा आणि नवीन कुमार जिंदाल यावर कारवाई न झाल्यास सोलापुरात मोठं आंदोलन करण्याचा इशारा मुस्लिम समाजाने दिला. 

Web Title: Muslim community in Solapur is aggressive against Nupur Sharma and Naveen Kumar Jindal