सोलापूरमध्ये भर यात्रेत बिहारी तरूणाचा खून, घटनेने खळबळ
By रूपेश हेळवे | Updated: January 19, 2023 16:51 IST2023-01-19T16:50:41+5:302023-01-19T16:51:42+5:30
सोलापूर : दोन गटात झालेल्या वादातून एका बिहारी कामगाराचा धारधार हत्याराने भोसकून खून केल्याची घटना गुरूवारी दुपारी घडली आहे. ...

सोलापूरमध्ये भर यात्रेत बिहारी तरूणाचा खून, घटनेने खळबळ
सोलापूर : दोन गटात झालेल्या वादातून एका बिहारी कामगाराचा धारधार हत्याराने भोसकून खून केल्याची घटना गुरूवारी दुपारी घडली आहे. अद्याप त्या तरुणाचे नाव कळू शकले नाही.
शहरात ग्रामदैवत श्री सिध्देश्वरात मंदिर परिसरात यात्रा भरलेली आहे. या यात्रेत शेकडो व्यावसायिकांचे स्टॉल लागलेले असून यात गुरूवारी दुपारी दोन गटात झालेल्या वादातून एका तरूणाचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेची माहिती कळताच सदर बाझारचे पोलिस निरीक्षक राघवेंद्रसिंह क्षीरसागर व अन्य वरिष्ठ अधिकारी हे घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, घटनेनंतर आरोपीने पळ काढल्याची माहिती तेथील नागरिकांनी दिली.