गाडी चालविण्यावरून केला मित्राचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:28 AM2021-06-09T04:28:20+5:302021-06-09T04:28:20+5:30

माळशिरस : सदाशिवनगरच्या शिवारात एका व्यक्तीच्या डोक्यात दगड घालून ठार मारल्याची घटना सोमवारी उघडीस आली. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून ...

Murder of a friend while driving | गाडी चालविण्यावरून केला मित्राचा खून

गाडी चालविण्यावरून केला मित्राचा खून

Next

माळशिरस : सदाशिवनगरच्या शिवारात एका व्यक्तीच्या डोक्यात दगड घालून ठार मारल्याची घटना सोमवारी उघडीस आली. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून २४ तासांत खुन्याचा शोध घेऊन त्याच्या मुसक्या आवळल्या. शिवाजी जगू कोळेकर असे मयत व्यक्तीचे नाव आहे. दारूच्या नशेत दारुड्या मित्राचा खून केल्याचे तपासात समोर आले आहे. धुळदेव भानुदास टेळे (रा. मांडवे) असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे.

याबाबत पोलीस सूत्रांनुसार शिवाजी कोळेकर याला अज्ञात व्यक्तीने डोक्यात दगड घालून जिवे मारल्याची घटना सदाशिवनगरच्या गावच्या शिवारातील शेती महामंडळाच्या जुन्या विहिरीजवळ जाधववाडी ते मांडवे जाणाऱ्या रस्त्यावरील ओढ्याजवळ घडली. याबाबत मयताचा मुलगा नवनाथ शिवाजी कोळेकर याने माळशिरस पोलिसांत तक्रार दाखल केली. या घटनेचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी नीरज राजगुरू व पोलीस निरीक्षक दीपरतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक महानवर यांनी तपासाची सूत्रे हलवली. तपासात शेजारी राहणारा धुळदेव भानुदास टेळे या शेजाऱ्यानेच दारूच्या नशेत मित्राचा खून केल्याचे निदर्शनास आले. यानुसार पोलिसांनी त्याला २४ तासांच्या आत ताब्यात घेतले. पुढील तपास करीत आहेत.

---

अन् दारूने घात केला

लॉकडाऊन संपला अन् शेजारी-शेजारी राहणारे दोन मित्र बाहेर पडले. दिवसभर काम करून मयत शिवाजी कोळेकर मित्र भानुदास टेळे याला स्वतःच्या गाडीवर दारू गुत्त्यावर दारू पिण्यासाठी आले. मनसोक्त पिऊन बरोबर घेऊन दोघे घरी निघाले. ओढ्याजवळ आल्यावर पुन्हा बैठक बसली. पुन्हा ग्लास भरले तिथून निघताना मात्र गाडी कुणी चालवायची यावरून वाद पेटला अन् मारामारीला सुरुवात झाली. पेटलेल्या भांडणात शिवाजी कोळेकर मयत झाला. शेवटी दारूनं मित्राने मित्राचा घात झाला.

Web Title: Murder of a friend while driving

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.