Murder of a friend by hitting his head on a rock; Accused arrested in 12 hours with the help of CCTV | दगडावर डोके आपटून मित्राचा खून; सीसीटीव्हीच्या मदतीने आरोपीस १२ तासात अटक

दगडावर डोके आपटून मित्राचा खून; सीसीटीव्हीच्या मदतीने आरोपीस १२ तासात अटक

सोलापूर : पूर्ववैमनस्यातून रवि बाबू रणखांबे (वय ३७, रा. भीमनगर, मुळेगाव) याने मित्राचे डोके दगडावर आपटून त्याचा निर्घृणपणे खून केल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. सुरेश बबन गायकवाड (वय २६, रा. मुळेगाव, ता. दक्षिण सोलापूर) असे खून झालेल्या मित्राचे नाव आहे. सीसीटीव्हीच्या मदतीने ग्रामीण पोलिसांनी आरोपीला १२ तासात अटक केली.

मुळेगाव येथील शेतकरी बिराजदार हे नेहमीप्रमाणे बुधवारी सकाळी आपल्या शेतात गेले. तेव्हा त्यांना शेतातील एका कोपऱ्यात सुरेश गायकवाड याचा मृतदेह आढळला. त्यांनी हा प्रकार पोलिसांना सांगितला. त्यानंतर पोलीस हे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळी फिंगरप्रिंट तज्ज्ञ आणि श्वान पथकास पाचारण केले. दरम्यान, पोलिसांनी त्या परिसरातील सीसीटीव्ही तपासले. त्यातील ग्रामपंचायतीने पाण्याच्या टाकीवर लावलेल्या सीसीटीव्हीमध्ये आरोपी रवि आणि सुरेश हे मंगळवारी मध्यरात्री गावातील बिसमिल्ला नगर येथून चालत जात असताना आढळले. यामुळे पोलिसांची संशयाची सुई रविकडे फिरली. त्याला सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याची कसून त्याने खून केल्याची कबुली दिली.

पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी प्रभाकर शिंदे यांच्या नेतृत्वाखाली, तालुका पोलीस चौकीचे पोलीस निरीक्षक सुहास जगताप, सपोनि नेताजी बंडगर, माधुरी तावरे, गायकवाड, नसिर खे, सुनील बनसोडे, फयाज बागवान, अनिस शेख, शशी कोळेकर, बिराजदार, देवा सोलंकर, अशोक खवतोडे, शंकर मुजगोंड, राजू इंगळे, रवि हटकिळे यांनी आरोपीला १२ तासात अटक केली.

दोघांनी पार्टीही केली...

मंगळवारी रात्री रवि आणि सुरेश या दोघांनी शेतात दारूची पार्टी केली. सूरजला नशा झाल्यावर रवि याने त्याचे डोके दगडावर आदळण्यास सुरुवात केली. त्यात त्याचा मृत्यू झाला. तो मरण पावल्याची खात्री झाल्यावर रविने तेथून पळ काढला.

Web Title: Murder of a friend by hitting his head on a rock; Accused arrested in 12 hours with the help of CCTV

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.