शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

प्रेमप्रकरणातून फुटबॉलपटूचा खून; प्रेत दवाखान्यात सोडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2019 12:48 IST

सोलापुरातील घटना; अज्ञात मारेकºयांचा शोध पोलीसांकडून सुरू

ठळक मुद्देप्रदीप अलाट हा राष्ट्रीय पातळीवरचा फुटबॉलपटू होताहलाखीच्या परिस्थितीत त्याने  बी.ए़, बी.एड.पर्यंतचे शिक्षण घेतले तो कुमार चौक येथे आपल्या आई व लहान भावासोबत राहत होता

सोलापूर : प्रेमप्रकरणावरून फॉरेस्टमधील कुमार चौकात राहणाºया एका पंचवीस वर्षीय फुटबॉल कोचला मारहाण करून त्याचा खून करण्यात आला. ही घटना शुक्रवारी दुपारी विजापूर नाका पोलीस स्टेशन हद्दीमध्ये घडली़ प्रदीप विजय अलाट (वय २५, रा. रेल्वे लाईन, कुमार चौक, फॉरेस्ट) असे मृत तरुणाचे नाव आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, प्रदीप हा सकाळपासूनच घरातून बाहेर गेला होता़ दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास तो घरी आला आणि लगेच घरातून निघून गेला़ तो प्रेयसीसोबत सिद्धेश्वर मंदिर परिसरात फिरायला गेला होता़ तेव्हा आरोपींनी त्याला पाहिले आणि फोन करू न बोलावून घेतले़ प्रदीप त्यांना भेटायला गेल्यावर आरोपींनी त्याचा खून केला.

दरम्यान, तीन वाजण्याच्या सुमारास प्रदीपने आपल्या मित्रांना फोन करून आपल्याला काही जण मारहाण करत आहेत, असे सांगून त्यांना लवकर येण्याची विनंती केली; पण मित्र पोहोचण्याच्या अगोदरच आरोपींनी प्रदीपला रिक्षामधून मोदी परिसरातील खासगी हॉस्पिटलमध्ये नेले. तेथील स्ट्रेचरवर त्याला टाकून यांचे नातेवाईक येत आहेत, असे सांगून हॉस्पिटलच्या कर्मचाºयांना सांगून आरोपींनी तेथून रिक्षातूनच पळून गेले़ डॉक्टरांनी प्रदीपच्या खिशामधील मोबाईलने त्याच्या मित्रांना फोन करून प्रदीपबद्दल माहिती दिली. त्यानंतर मित्रांनी ही माहिती प्रदीपच्या कुटुंबीयांना दिली.

 दरम्यान, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.  कुटुंबीयांना माहिती कळाल्यानंतर लगेचच त्यांनी हॉस्पिटलमध्ये गर्दी केली होती़ त्यानंतर सायंकाळच्या सुमारास प्रदीपचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रूग्णालयात पाठवण्यात आला. शनिवारी सकाळी शवविच्छेदन करण्यात येणार आहे़; मात्र जोपर्यंत आरोपींना पकडण्यात येत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी अशी भूमिका प्रदीपच्या नातेवाईकांनी घेतली आहे.  रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल होण्याचे काम सुरू होते़ही घटना जेव्हा मोदी परिसरात कळाली तेव्हा तेथे तणाव निर्माण झाला. त्यामुळे पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता़ ---------------प्रदीप अलाट हा राष्ट्रीय पातळीवरचा फुटबॉलपटू होता़  हलाखीच्या परिस्थितीत त्याने  बी.ए़, बी.एड.पर्यंतचे शिक्षण घेतले होते़ तो कुमार चौक येथे आपल्या आई व लहान भावासोबत राहत होता़ सोलापुरातील विविध शैक्षणिक संस्थांमध्ये फुटबॉलचे प्रशिक्षण देण्याचे काम तो करत होता़ यावरच तो आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता़ कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी त्याच्यावर होती.--------------हॉस्पिटलमधील कॅमेरे अस्पष्ट मारहाण करून प्रदीपला खासगी हॉस्पिटलमध्ये टाकून निघून गेले़ पण त्याला कोणत्या रिक्षामधून आणले होते? कोणी आणले होते? याची माहिती घेण्यासाठी जेव्हा पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज पाहिले; तेव्हा त्यामध्ये अस्पष्ट चित्र दिसून आले़ 

टॅग्स :SolapurसोलापूरFootballफुटबॉलMurderखूनCrime Newsगुन्हेगारीSolapur City Policeसोलापूर शहर पोलीस