महापालिकेच्या निवडणुका सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये, महायुती म्हणून एकत्र लढणार : चंद्रशेखर बावनकुळे

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2025 07:45 IST2025-05-30T07:45:11+5:302025-05-30T07:45:11+5:30

सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला चार महिन्यांत निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत

Municipal elections will be held in September October says Chandrashekhar Bawankule | महापालिकेच्या निवडणुका सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये, महायुती म्हणून एकत्र लढणार : चंद्रशेखर बावनकुळे

महापालिकेच्या निवडणुका सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये, महायुती म्हणून एकत्र लढणार : चंद्रशेखर बावनकुळे

सोलापूर : सर्वोच्च न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला चार महिन्यांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत. निवडणुका घेण्याचा अधिकार आयोगाचा आहे. राज्य सरकार केवळ यंत्रणा पुरवते. पावसाळा झाल्यानंतर सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये निवडणुका होऊ शकतात, असे मत राज्याचे महसूल मंत्री तथा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितले.

महायुती म्हणून एकत्र लढणार 

बावनकुळे म्हणाले, निवडणुका महायुती म्हणून एकत्र लढल्या जातील. उद्या निवडणुका जाहीर झाल्या तरी भाजप तयार आहे. भूमी अभिलेख कार्यालयातील कर्मचारी विविध मागण्यांसाठी संपावर आहेत. याबाबत महसूल मंत्री बावनकुळे म्हणाले, कोणतीही पूर्वकल्पना न देता कर्मचाऱ्यांनी संप सुरू केला आहे. त्यांनी तत्काळ कामावर आले पाहिजे. आम्ही युनियनबाजी खपवून घेणार नाही. त्यांच्यावर कारवाई होईल. संपावर गेलेले कर्मचारी कामावर आले तरच त्यांच्या मागण्यांवर चर्चा होईल. कामावर आला तर मंगळवारी मुंबईत बैठक लावतो, असेही त्यांनी सांगितले.
 

Web Title: Municipal elections will be held in September October says Chandrashekhar Bawankule