पार्क स्टेडियममधील ५९ गाळे महापालिकेने केले बंद; गाळेधारकांनी केला महापालिकेचा निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 16:06 IST2021-03-22T16:06:53+5:302021-03-22T16:06:59+5:30

सोलापूर लोकमत ब्रेकींग

Municipal Corporation closes 59 floors in Park Stadium; Stakeholders protested against the Municipal Corporation | पार्क स्टेडियममधील ५९ गाळे महापालिकेने केले बंद; गाळेधारकांनी केला महापालिकेचा निषेध

पार्क स्टेडियममधील ५९ गाळे महापालिकेने केले बंद; गाळेधारकांनी केला महापालिकेचा निषेध

सोलापूर -  शहरातील पार्क स्टेडियम येथील 59 गाळेधारकांनी महानगरपालिकेनं बजावलेल्या भाडेवाढीच्या नोटिशीचा निषेध करत आजपासून दुकानं बंद ठेवली आहेत.

दरम्यान, जोपर्यंत भाडेवाढ मागे घेतली जात नाही, तोपर्यंत गाळे, दुकाने बंद असेल असं पार्क स्टेडियम शोरूम असोसिएशनच्या पत्रकार परिषदेत आज सांगण्यात आलं. यावेळी स्टेडियमचे पदाधिकारी व्यापारी उपस्थित होते. महापालिकेने शनिवारी या सर्व गाळेधारकांना शासनाच्या आणि महापालिकेच्या निर्णयानुसार भाडेवाढीच्या नोटिसा बजावल्या आहेत ही भाडेवाढ मान्य करून भाडे आदा न केल्यास दुकानं मालमत्तेसह सील केली जातील असेही नोटीसमध्ये म्हटलं आहे. पत्रकार परिषदेत उमेश ऐनापुरे, सतीश बिद्री, किरण यज्जा, केतन शहा उपस्थित होते. 

Web Title: Municipal Corporation closes 59 floors in Park Stadium; Stakeholders protested against the Municipal Corporation