शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

पायाखाली चिखल, डोक्यावर खुर्ची; तीन तास पावसातही उत्साह दाटून !

By ऑनलाइन लोकमत | Published: September 02, 2019 5:10 AM

चार जिल्ह्यांतील कार्यकर्ते सभेला; सोलापूर, उस्मानाबाद, सातारा अन् कोल्हापूरच्या गाड्या धडकल्या मैदानावर

सोलापूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रा समारोपाच्या सभेस पार्क मैदानावर जमलेल्या भाजपचे कार्यकर्ते आणि सोलापूरकर श्रोत्यांना पावसाचा सामना करावा लागला. जोरदार वृष्टी होत असल्याने संपूर्ण मैदानावर चिखल निर्माण झाला. यास्थितीतही कार्यकर्ते मैदानातून हलले नाहीत. पावसाच्या बचावासाठी डोक्यावर खुर्ची घेऊन चिखल तुडवित ते मोठ्या उत्साहात उभे होते.

पावसाला सुरुवात झाली तेव्हा मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा तुळजापूरहून सोलापूरकडे मार्गस्थ झाली होती. सुमारे अर्धा पाऊण तास जोरदार पाऊस कोसळत होता. या स्थितीत मैदानावर गोंधळ उडेल, अशी भीती निर्माण झाली होती. पण सोलापूरकरांनी संयम पाळत जागेवरच थांबणे पसंत केले. पावसाची रिपरिप वाढल्यानंतर त्यांनी डोक्यावर खुर्ची धरण्यास सुरुवात केली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा ताफा पाहण्यासाठी भर पावसात सोलापूरकरांनी गर्दी केली होती. काहींनी पाऊस पडत असताना मोबाईलवरुन फोटो व व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न करत अमित शहा यांच्या ताफ्याला कॅमेऱ्यात कैद करण्याचा प्रयत्न केला. परिसरातील नागरिकांचा त्रास होऊ नये यासाठी पोलिसांनी खबरदारी घेतली होती. रस्त्यामधून कोणी येऊ नये यासाठी बॅरिकेड्स लावण्यात आले होते. होटगी रोड परिसरातील प्रत्येक चौकामध्ये पोलिसांची उपस्थिती होती. वाहनधारकांना दुसºया बाजूने जाण्याच्या सूचना यावेळी देण्यात येत होत्या.

पाऊस पडत असल्याने अमित शहा येणार नाहीत अशी चर्चा होती; मात्र त्यावेळेस इतका पोलीस बंदोबस्त लावला म्हणजे ते नक्की येतील अशी आशा काहींनी व्यक्त केली. अशातच ४:४० वाजता अमित शहा विमानतळावर आले. यावेळी पालकमंत्री विजयकुमार देशमुख, महापौर शोभा बनशेट्टी, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी पुष्पगुच्छ देऊन अमित शहा यांचे स्वागत केले.ताफ्यामध्ये घुसली रिक्षा अमित शहा यांच्या ताफ्यामध्ये सुमारे २३ गाड्यांचा समावेश होता. ताफ्यातील पहिले वाहन विमानतळाच्या बाहेर पडल्यानंतर पोलिसांचे लक्ष हे रस्त्याकडे न राहता विमानतळाच्या प्रवेशद्वाराकडे असतानाच एक रिक्षा चालक प्रवाशांना घेऊन ताफ्याच्या मधोमध आला. रिक्षा घुसल्याने गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती.अमित शहांनी थोपटली मुख्यमंत्र्यांची पाठमुख्यमंत्र्यांची यात्रा सोलापुरात पोहोचण्यापूर्वी सुमारे दीड तास अमित शहा सोलापुरात दाखल झाले होते. विमानतळावरून शासकीय विश्रामगृहात गेले. यात्रेची प्रतीक्षा करीत तेथेच थांबून राहिले. यात्रेने उळेगाव पार केल्यानंतर अमित शहा डाक बंगल्यातून जुना पुना नाका येथील छत्रपती संभाजी महाराज चौकात गेले. तेथे यात्रेच्या बसवर जाऊन उपस्थितांना अभिवादन केले आणि मुख्यमंत्र्यांच्या समोर येताच त्यांच्या पाठीवर शहा यांनी थाप देऊन संपूर्ण यात्रेच्या प्रतिसादाबद्दल त्यांचे कौतुक केले.

टॅग्स :SolapurसोलापूरAmit Shahअमित शहाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस