शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

अखंडित वीजपुरवठ्यासाठी महावितरणचे राज्यात ४० हजार ‘प्रकाशदूत’

By appasaheb.patil | Published: May 20, 2020 1:01 PM

विशेष पथके तैनात; वादळी वारे, पावसामुळे महावितरणचे होऊ लागले नुकसान

ठळक मुद्देमहावितरणचे अभियंते व कर्मचारी देखील वीजपुरवठा सुरळीत ठेवून या विभागांना ऊर्जा देत आहेतखरे पाहिले तर वीज हे क्षेत्र इतर अत्यावश्यक सेवेतील सर्वच क्षेत्रांसाठी अत्यंत अत्यावश्यककोणत्याही परिस्थितीत जास्त काळासाठी वीज बंद न ठेवता तो पुरवठा सुरळीत ठेवण्याचे आदेश

सोलापूर : अवघ्या जगाला व्यापून टाकणारा कोरोना विषाणू म्हणजेच कोविड-१९ या संसर्गजन्य आजाराची लढाई आता निर्णायक टप्प्यात आली आहे. प्रत्येक घरातून, प्रत्येक देशात ही लढाई सुरू आहे. या लढाईचे नेतृत्व वैद्यकीय क्षेत्राकडे असले तरी त्यांना पूरक सेवा देणारे अनेक क्षेत्र अत्यावश्यक सेवेसाठी अहोरात्र कार्यरत आहेत. त्यापैकी एक महत्त्वाचे क्षेत्र म्हणजे वीज क्षेत्र. आपले कर्तव्य चोखपणे बजावत कोरोनाविरोधात झुंज देणारे कोविड योद्धा असोत किंवा लॉकडाऊनमुळे घरीच राहणारे नागरिक किंवा घरूनच काम करणारे (वर्क फ्रॉम होम) सर्व क्षेत्रातील अधिकारी, कर्मचारी यांना सध्या गरज आहे ती अखंडित वीजपुरवठ्याची. ही सेवा देण्यासाठी महावितरणचे सुमारे ४० हजार अभियंते, तांत्रिक कर्मचारी अहोरात्र कार्यरत असल्याची माहिती महावितरणच्या प्रशासनाने दिली.

कोरोनाविरुद्धच्या लढाईत वैद्यकीय, पोलीस, महसूल, आरोग्य आदी अनेक शासकीय विभाग झुंज देत आहेत. शासनाचाच एक भाग असलेले महावितरणचे अभियंते व कर्मचारी देखील वीजपुरवठा सुरळीत ठेवून या विभागांना ऊर्जा देत आहेत. खरे पाहिले तर वीज हे क्षेत्र इतर अत्यावश्यक सेवेतील सर्वच क्षेत्रांसाठी अत्यंत अत्यावश्यक आहे. कोणत्याही भागातील वीजपुरवठा खंडित झाल्यास तो त्वरित दुरुस्त करण्यासाठी महावितरण अंतर्गत असलेल्या शाखा कार्यालयामार्फत विशेष पथके तैनात करण्यात आली आहेत. कोणत्याही परिस्थितीत जास्त काळासाठी वीज बंद न ठेवता तो पुरवठा सुरळीत ठेवण्याचे आदेश महावितरणला वरिष्ठ पातळीवरून प्राप्त झाले असल्याचेही सांगण्यात आले.

वीजपुरवठा खंडितचे प्रकार वाढले...- एप्रिल-मे मधील वादळ, गारपीट आणि मुसळधार पावसामुळे झाडे, झाडांच्या फांद्या वीजयंत्रणेवर कोसळून वीजयंत्रणा जमीनदोस्त होत आहे. वीजयंत्रणेवर पावसाचे पाणी पडले की वीजवाहिन्या नादुरुस्त होतात व वीजपुरवठा खंडित होतो. एवढेच नव्हे तर उपकेंद्रातील पॉवर ट्रान्स्फॉर्मर नादुरुस्त होणे, पेट घेण्याचे प्रमाण वाढत आहे.  साधारणत: मार्चमध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सुरु झाला आहे. उन्हामुळे तापलेल्या वीजयंत्रणेवर पावसाचे दोन-तीन टपोरे थेंब पडल्यावर पीन किंवा पोस्ट इन्सूलेटर फुटून वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार वाढत असल्याचे महावितरणच्या अधिकाºयाने सांगितले.

वीज खांब कोसळण्याचे प्रमाण वाढले...कोरोना विषाणूने महावितरणच्या अभियंता व कर्मचाºयांंची परीक्षाच सुरू आहे. गेल्या दीड महिन्यात राज्यामध्ये सर्वदूर भागात अवकाळी पाऊस, वादळी वाºयामुळे राज्यात हजारो वीजखांब वीजवाहिन्यांसह कोसळले आहेत. लॉकडाऊनमुळे मर्यादित मनुष्यबळ उपलब्ध असताना अक्षरश: रात्रंदिवस काम करीत महावितरणच्या अभियंता व कर्मचाºयांनी वीजयंत्रणेची मोठी हानी झाली असताना विक्रमी वेळेत वीजपुरवठा सुरळीत करीत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरmahavitaranमहावितरणRainपाऊसcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस