सोलापूरात नाभिक समाजाचे आंदोलन, मुख्यमंत्र्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2017 12:31 IST2017-11-18T12:30:11+5:302017-11-18T12:31:50+5:30

नाभिक समाजाबद्दल निंदनीय व अपमानास्पद भाष्य केल्याबद्दल संतप्त झालेल्या नाभिक समाजाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले़

The movement of the Nawabik community in Solapur, the shocking slogan against the Chief Minister | सोलापूरात नाभिक समाजाचे आंदोलन, मुख्यमंत्र्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी

सोलापूरात नाभिक समाजाचे आंदोलन, मुख्यमंत्र्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी

ठळक मुद्देमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजीनाभिक समाजाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शब्दाचा जाहीर निषेध


आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि १९ : नाभिक समाजाबद्दल निंदनीय व अपमानास्पद भाष्य केल्याबद्दल संतप्त झालेल्या नाभिक समाजाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले़ यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली़ 
मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी १२ नोव्हेंबर रोजी भिमा सहकारी साखर कारखाना पाटस, ता़ दौंड जि़ पुणे येथील कार्यक्रमात नाभिक समाजाबाबत निंदनीय उल्लेख केला होता़ मागील सरकारची कार्यपध्दती सांगण्यासाठी नाभिक समाजातील व्यावसायिक हे जसे गिºहाईक टिकविण्यासाठी प्रत्येकाचे अर्धी दाढी, अर्धी मिशी कट असे अर्धे अर्धे काम करतात तसे मागील सरकारने कार्य केले आहे असे उदाहरण म्हणून सांगितले होते़ पण नाभिक आपण सागत आहेत तसेच कार्य करत असतात हे नाभिक समाजास सिध्द करून दाखवावे अशी मागणी नाभिक समाजाने निवेदनाव्दारे केली आहे़ 
यावेळी सोलापूर शहर व महाराष्ट्रातील नाभिक समाज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शब्दाचा जाहीर निषेध केला़ 
यावेळी संतोष धोत्रे, अ‍ॅड़ विकास तिºहेकर, गोवर्धन कोडपाक, शरणू हडपद, श्रीनिवास रासकोंडा, सुधीर वड्डेपल्ली आदी नाभिक समाजातील पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते़

Web Title: The movement of the Nawabik community in Solapur, the shocking slogan against the Chief Minister