शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

गावावर शोककळा! गडेकर कुटुंब हंबरडा फोडत म्हणाले... तुम्हाला कुठे शोधू

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2022 17:40 IST

माढा तालुक्यातील अंजनगाव खेलोबा येथील संजय ज्ञानदेव गडेकर, राहुल संजय गडेकर हे बाप-लेक अनगरजवळ उसाच्या ट्रॅक्टर ट्रॉलीखाली सापडून ठार झाले.

सोलापूर/माढा : माझ्या सोन्या तुम्हाला आता कुठे शोधू ... हे काय झाले... असा आक्रोश करीत गडेकर कुटुंबीयांनी हंबरडा फोडला अन् संजय गडेकर व राहुल गडेकर या बाप-लेकांना एकाचवेळी निरोप दिला. पतीला व एकुलत्या मुलाला निरोप देताना मातेने फोडलेल्या हंबरड्याने अनेकांचे डोळे पाणावले. माढा तालुक्यातील अंजनगाव खेलोबा येथील संजय ज्ञानदेव गडेकर, राहुल संजय गडेकर हे बाप-लेक अनगरजवळ उसाच्या ट्रॅक्टर ट्रॉलीखाली सापडून ठार झाले. संजय गडेकर (४८) व राहुल गडेकर (१७) असे त्या बाप-लेकाचे नाव असून शुक्रवारी सायंकाळी अनगरनजीक एका नर्सरीजवळ हा अपघात झाला. 

नव्याने लावलेल्या द्राक्ष बागेच्या संगोपनासाठी शुक्रवार, ७ जानेवारी रोजी सायंकाळी ७.१५ वाजता खते आणायला गेले. ते दोघे अनगरहून अंजनगावकडे दुचाकीवर खते घेऊन निघाले होते. तर ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर हे अंजनगावहून अनगरकडे निघाला होता. इतक्यात या उसाच्या ट्रॅक्टरमागून एक दुचाकी ओव्हरटेक करत आली आणि समोर आलेल्या बापलेकाच्या दुचाकीला धडकली. हा अपघात इतका भीषण होता की दुचाकीच्या धडकेने संजय हे उडून ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर ट्रॉलीखाली सापडले आणि गंभीर जखमी झाले. इतक्यात बघ्यांनी गर्दी केली आणि काहींनी त्यांना उपचारासाठी हलविले असता संजय यांचा रस्त्यातच मृत्यू झाला. मुलगा राहुल याचा मध्यरात्री उपचारादरम्यान मृत्यू झाला.

चुली, दुकाने बंद ठेवून पाळला दुखवटा

अपघाताची बातमी ही वाऱ्यासारखी गावात पसरली. या अपघाताने अंजनगावावर शोककळा पसरली.

संजय हे मितभाषी आणि गोड स्वभावाचे होते. ग्रामस्थांनी दुकाने बंद ठेवून दुखवटा पाळला. अनेकांनी घराच्या चुली देखील पेटवल्या नाहीत. मयत राहुल अनगर येथे महाविद्यालयीन शिक्षण घेत होता. 

टॅग्स :Accidentअपघातmadha-pcमाढाSolapurसोलापूरDeathमृत्यू