मोटारसायकलची समोरासमोर धडक; दोघांचा जागीच मृत्यू; माळशिरस तालुक्यातील अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2021 10:25 PM2021-08-04T22:25:05+5:302021-08-04T22:27:47+5:30

सोलापूर लोकमत ब्रेकिंग

Motorcycle head-on collision; Both died on the spot; Accident in Malshiras taluka | मोटारसायकलची समोरासमोर धडक; दोघांचा जागीच मृत्यू; माळशिरस तालुक्यातील अपघात

मोटारसायकलची समोरासमोर धडक; दोघांचा जागीच मृत्यू; माळशिरस तालुक्यातील अपघात

googlenewsNext

माळशिरसमाळशिरस तालुक्यातील घुलेवस्ती येथे दोन मोटारसायकलची समोरासमोर धडक झाली. या अपघातात मोटारसायकलवरील दोन जण ठार झाल्याची घटना आज बुधवार सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडली. 

सांगवी (ता.फलटण) येथील हणुमंत शंकर बेलदार (वय ४२, रा.सांगवी ता.फलटण जि.सातारा) हे आपल्या बुलेट मोटार सायकल क्र. एम.एच.११ सी.के. २७२७ वरुन जत (जि. सांगली ) कडे निघाले होते.  तर माळशिरस येथील रावसाहेब सिद ( वय ४५ ) हे आपल्या शेतातील काम करून खुडूसकडून माळशिरसकडे आपल्या मोटार सायकल क्र एम एच ४५ सी ४९९३ वरून येत होते. पुणे - पंढरपूर पालखी मार्गावर घुलेवस्तीजवळ दोन्ही मोटार सायकलची समोरा सुमोर धडक झाली. ही धडक एवढी जोरात झाली की अपघातात दोन्ही मोटार सायकल चालक जागेवरच ठार झाले. हनुमंत बेलदार हे फलटण एस टी आगारात चालक म्हणून काम करीत होते. 

Web Title: Motorcycle head-on collision; Both died on the spot; Accident in Malshiras taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.