सोलापूर महापालिकेच्या इंद्रभुवन बागेत वानराचा उच्छाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2018 12:33 IST2018-08-07T11:58:59+5:302018-08-07T12:33:45+5:30

Monorail of the Vanara in the garden of the Goddess of Solapur | सोलापूर महापालिकेच्या इंद्रभुवन बागेत वानराचा उच्छाद

सोलापूर महापालिकेच्या इंद्रभुवन बागेत वानराचा उच्छाद

ठळक मुद्दे- महापालिकेत कामासाठी आलेल्या नागरिकांची धावपळ- प्राणीसंग्रहालय व वनविभागाकडून वानरास पकडण्यासाठी शर्यतीचे प्रयत्न सुरू- वानराचा उच्छाद पाहुण बघ्यांची गर्दी 

सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेच्या इंद्रभुवन इमारतीसमोरील बागेत एका भटक्या वानराने मंगळवारी सकाळी अकराच्या सुमारास उच्छाद मांडल्यामुळे वनविभाग व प्राणी संग्रहालयाच्या कर्मचाºयांची त्याला पकडण्यासाठी धावपळ उडाली.

दरम्यान, शनिवार ४ आॅगस्ट रोजी महापालिकेच्या इमारतीसमोरील एका भटक्या वानराला जेरबंद केल्याची घटना ताजी असताना मंगळवारी आणखी एका वानराने महापालिकेच्या इमारतीसमोर उच्छाद मांडला. इंद्रभुवन बागेत या वानराने इकडून तिकडे उड्या मारण्यास सुरूवात केल्यानंतर महापालिकेत सकाळी आलेल्या नागरिकांनी धावपळ उडाली़ महापालिका प्रशासनाने याबाबत प्राणीसंग्रहालयाचे वैद्यकीय अधिकारी शुभांगी सादने यांना कळविले तर वनविभागाच्या पथकामार्फत त्यांनी इंद्रभुवन बागेत धाव घेतली़ पथकातील कर्मचारी पाहुन वानराने चिंचेच्या झाडावर उंचठिकाणी बसकन मारली़ गनव्दारे भुलीचे इजेक्शन देऊन त्या वानराला पकडण्याचा प्रयत्न सुरू आहे.


 

Web Title: Monorail of the Vanara in the garden of the Goddess of Solapur