मोहन भागवत यांचा सोलापूर महापालिकेच्या सभेत अभिनंदनाचा ठराव मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2018 14:36 IST2018-09-18T14:36:05+5:302018-09-18T14:36:47+5:30

मोहन भागवत यांचा सोलापूर महापालिकेच्या सभेत अभिनंदनाचा ठराव मंजूर
सोलापूर : देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात काँग्रेसचे मोठे योगदान असल्याचे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले़ याबद्दल भाजपशासित सोलापूर महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत भागवत यांच्या अभिनंदनाचा ठराव मंजूर करण्यात आला.
काँग्रेसचे गटनेते चेतन नरोटे यांनी हा प्रस्ताव मांडला़ संघाने आजवर कॉग्रेसवर टिका केली़ गेल्या सत्तर वर्षात काँग्रेसने काहीच केले नाही असे त्याचे लोक सांगत असतात पण भागवत यांनी काँग्रेसचे स्वातंत्र्य लढ्यात योगदान असल्याचे सांगून टाकले आहे. कुठेतरी त्यांना सत्य कळालेले आहे़ हे त्याचे चांगले विधान आहे़ त्यामुळे मी त्यांचा अभिनंदनाचा ठराव मांडत असल्याचे चेतन नरोटे यांनी सांगितले़ भाजपाचे श्रीनिवास रिकमल्ले यांनीही या ठरावाचे स्वागत केले़ महापौर शोभा बनशेट्टी यांनी ठराव मंजूर केल्याचे जाहीर केले़