मोदींची गॅरंटी कागदावर नाही तर वास्तवात - मुख्यमंत्री 

By दिपक दुपारगुडे | Updated: January 19, 2024 12:53 IST2024-01-19T12:52:00+5:302024-01-19T12:53:02+5:30

"शिलान्यास हमने किया है चाबी देने के लिये हम ही आयेंगे मोदी म्हणाले होते, याला म्हणातात मोदी गॅरंटी."

Modi's guarantee is not on paper but in reality says Chief Minister | मोदींची गॅरंटी कागदावर नाही तर वास्तवात - मुख्यमंत्री 

मोदींची गॅरंटी कागदावर नाही तर वास्तवात - मुख्यमंत्री 

सोलापूर : सोलापुरात अमृत २.० योजनेचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच रे नगर येतळी गृहप्रकल्पातील काही लाभार्थांना मोदींच्या हस्ते घरांची किल्ली सोपविण्यात आली.  या कार्यक्रमात  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील उपस्थित आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, "घरं मिळालेल्या सर्व कामगारांचे अभिनंदन करतो. शिलान्यास हमने किया है चाबी देने के लिये हम ही आयेंगे मोदी म्हणाले होते, याला म्हणातात मोदी गॅरंटी. 

मोदींच्या शुभहस्ते समृद्धी महामार्ग, अटल सेतू भुमिपुजन आणि लोकार्पण मोदींच्या हस्ते झालं, मोदींची गॅरंटी कागदावर नाही तर वास्तवात आहे. तसेच डाओसमध्ये ३ लाख ५३ हजार करोडचे एमओयुवर सह्या झाल्यात. मी तिथे अनेकांना भेटलो सर्वाच्या मुखी फक्त एकच नाव होतं मोदीजींचे, असेही एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले. 

अनेक उद्योगपती तिथे आले होते. त्यांना गॅरंटी आहे, मोदी जी पुन्हा एकदा देशात सत्ता स्थापन करणार आहे. आपच्या राज्यात देखील डबल इंजिन सरकार बनणार असल्याचेही शिंदे यावेळी म्हणाले.

Web Title: Modi's guarantee is not on paper but in reality says Chief Minister