शहरं
Join us  
Trending Stories
1
34 हजार कोटींचा बँक घोटाळा; DHFL चा माजी संचालक धीरज वाधवानला CBI ने घेतले ताब्यात
2
राहुल द्रविडनंतर BCCI मुख्य प्रशिक्षक म्हणून CSK च्या ताफ्यातील प्रमुख व्यक्तीचा करतेय विचार 
3
अजितदादा आणखी ५-६ दिवस थांबले असते तर शरद पवार 'तो' निर्णय घेणार होते; पाटलांचा खुलासा
4
घाटकोपर होर्डिंगप्रकरणी दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अंबादास दानवेंची मागणी
5
KL Rahul चा अफलातून झेल पाहून संजीव गोएंका खूश झाले; टाळ्या वाजवताना दिसले, Video
6
VIP चोराची अजब कहाणी! वर्षभरात 200वेळा विमानप्रवास; फ्लाईटमधून कोट्यवधींचे दागिने लंपास
7
Kangana Ranaut : 7 किलो सोनं, 60 किलो चांदी, 50 LIC पॉलिसी...; कोट्यवधींची मालकीण आहे कंगना राणौत
8
'कल्याणमध्ये ठाकरेसेना-शिंदेंसेनेची नुरा कुस्ती, निवडणुकीनंतर मोदी आणि ठाकरे एकत्र येतील', प्रकाश आंबेडकर यांचा दावा
9
स्वाती मालिवाल यांच्यासोबत गैरवर्तन झालं, AAP ने दिली कबुली, दोषींवर केजरीवाल करणार कठोर कारवाई
10
आधी झापलं, मग जेवायला घरी बोलावलं! Sanjiv Goenka यांची लोकेश राहुलला झप्पी
11
T20 World Cup मध्ये भारताची डोकेदुखी वाढवणारी बातमी! ICC च्या नियमामुळे गोंधळ 
12
"अग्निवीर योजना फाडून कचऱ्यात फेकून देऊ", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल 
13
लवंगाचे पाणी आरोग्यासाठी रामबाण, मिळतील आश्चर्यकारक फायदे!
14
'चंदा लो, धंदा दो' या महायुतीच्या धोरणामुळेच झाली होर्डिंग दुर्घटना; विजय वडेट्टीवारांचे टीकास्त्र
15
Arvind Kejriwal : "तुम्ही कमळाचं बटण दाबलंत तर मला पुन्हा जेलमध्ये जावं लागेल पण जर..."
16
Narendra Modi : "केरळने धडा शिकवला, उत्तर प्रदेशच्या जनतेनेही ओळखलंय"; मोदींचा राहुल गांधींना खोचक टोला
17
सैन्यातील नोकरी सोडून गाझातल्या लोकांच्या मदतीसाठी धावले; इस्रायलच्या हल्ल्यात वैभव काळेंचा मृत्यू
18
Akhilesh Yadav : "भाजपाने Google वर 100 कोटींचा प्रचार करण्याचा रेकॉर्ड केला... हा जनतेचा पैसा"
19
ॐ मित्राय नमः! सूर्यनमस्काराचे १० जबरदस्त फायदे; इतका परिपूर्ण व्यायाम की जिमची गरजही नाही
20
यामिनी जाधव, वायकरांना उमेदवारी का दिली? मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, 'त्यांची चूक असती तर मी...'

मॉक ड्रील;  सोलापूर रेल्वे स्टेशनवर अतिरेकी... सुरक्षा रक्षकाच्या ताफ्याने पळापळ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2019 12:23 PM

निवडणुकीच्या काळात घातपात कारवाया, शांतता, सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलीस आयुक्तालय प्रशासनाकडून खबरदारी घेण्यात येत आहे.

ठळक मुद्देनिवडणुकीच्या काळात घातपात कारवाया, शांतता, सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलीस आयुक्तालय प्रशासनाकडून खबरदारी घेण्यात येत आहे.एखाद्या गंभीर घटनेच्या ठिकाणी पोलीस दल किती तत्पर आहे याचा मागोवा घेण्याच्या दृष्टीने अशी प्रात्यक्षिके

सोलापूर: सायंकाळची सव्वापाचची वेळ... रेल्वे स्टेशनवर प्रवाशांची लगबग.. अचानक स्टेशनवरील महिला आरक्षण कक्षामध्ये तीन अतिरेकी घुसल्याची खबर मिळाली अन्  एकापाठोपाठ सायरन वाजवत अ‍ॅम्ब्युलन्ससह पोलिसांचा ताफा दाखल झाला. गर्दीला पांगवत रायफलधारी क्यूआरटी पथकाकडून डॉग पथकाच्या मदतीने दोन अतिरेक्यांना कंठस्नान देताना एक पळून गेला. या धुमश्चक्रीत एक पोलीस शहीद झाला. तब्बल एक तास ही शोधमोहीम सुरु होती. श्वास रोखून जमलेल्या प्रवाशांना अखेर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सतर्क राहण्यासाठीचे प्रात्यक्षिक असल्याचे जाहीर केले. यानंतर प्रवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला. 

निवडणुकीच्या काळात घातपात कारवाया, शांतता, सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलीस आयुक्तालय प्रशासनाकडून खबरदारी घेण्यात येत आहे. एखाद्या गंभीर घटनेच्या ठिकाणी पोलीस दल किती तत्पर आहे याचा मागोवा घेण्याच्या दृष्टीने अशी प्रात्यक्षिके विविध ठिकाणी राबवण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. 

ही मोहीम पार पडेपर्यंत गोपनीय ठेवण्यात आली. सायंकाळी पोलीस आयुक्तालयातील नियंत्रण कक्षामधील दूरध्वनी खणखणला. तिकडून रेल्वे स्टेशनवरील महिला आरक्षण कक्षात अतिरेकी घुसल्याची खबर मिळताच. तातडीने सदर बझार पोलीस ठाण्यासह विविध पथकांना खबर दिली. तातडीने शीघ्र कृती दलाचे (क्यूआरटी) पथक स्टेशनवर दाखल झाले. सोबत डॉग पथकाचेही आगमन झाले. आरक्षण कक्षात महिला प्रवाशांना बाहेर काढून डॉग पथकाच्या सहाय्याने दोन अतिरेक्यांचा मागोवा घेऊन त्यांना मारण्यात यश आले. एकाला ताब्यात घेतले. या झटापटीत शीघ्र कृती दलाच्या एक जवानाला जीव गमवावा लागला. सायंकाळी ५.१५ ते ६.१५ अशी एक तासानंतर ही मोहीम फत्ते झाली. 

तासभर संबंध स्टेशनवर एकच घबराट पसरली होती. बाहेरच्या बाजूला असंख्य प्रवासी वर्ग श्वास रोखून हा सारा प्रकार पाहत होते. मोहीम फत्ते झाल्यानंतर हा आपत्ती व्यवस्थापनाचा भाग होता असे जाहीर केल्यानंतर सबंध गर्दी पांगली. या मोहिमेत सदर बझार पोलीस ठाण्याचा ताफा, शीघ्र कृती दलाचे पथक, सहा. पोलीस आयुक्त वैशाली शिंदे, रुपाली दरेकर, रेल्वे पोलीस ठाण्याचे अधिकारी, पोलीस निरीक्षक सय्यद,  विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब भालचिम, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी बडे, अ‍ॅम्ब्युलन्सचा ताफा या सर्वांनी या मोहिमेसाठी परिश्रम घेतले.

दक्षता जनतेच्या सुरक्षेची..- सध्या देशभरात अतिरेकी कारवायांच्या घटना घडत असताना शहरभर शांतता, सुव्यवस्थेसाठी सर्वत्र ‘मॉक ड्रील’ मोहीम राबवण्यात येते. एखाद्या गंभीर घटनेला सामोरे जाण्याच्या दृष्टीने घ्यावयाची खबरदारी अशा मोहिमांमधून राबवण्यात येते. यातून प्रशासकीय यंत्रणा कितपत तत्पर आहे. यात काय उणिवा राहिल्या याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला जातो. पुढील काळात त्या होणार नाहीत याची दक्षता घेण्यात येते. जनतेच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही प्रात्यक्षिके घेण्यात येत असल्याचे विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब भालचिम यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Solapurसोलापूरrailwayरेल्वेSolapur City Policeसोलापूर शहर पोलीस