शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

बचत गटातील महिलांच्या कर्जमाफीसाठी मनसेचा पंढरपुरात मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2020 13:24 IST

सोलापूर लोकमत बातमी...

सोलापूर : कोरोनामुळे सर्व उद्योग व्यवसाय बंद पडले आहेत. कोणाच्याही हाताला काम नाही़ उपासमारीची वेळ आली आहे, न्हवे तर भूक बळी जात आहेत, अनेक लोक आर्थिक अडचणीमुळे आत्महत्या करत आहेत. राज्यातील लाखो महिलांनी कर्ज घेतले आहे पण व्यवसायच बंद पडल्यामुळे ते कर्ज भरू शकत नाही तरी शासनाने बचत गटाच्या माध्यमातून महिलांनी घेतलेले कर्ज त्वरीत माफ करावे या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने पंढरपुरात मोर्चा काढण्यात आला. यावेळी विविध मागण्यांचे निवेदन प्रांताधिकाºयांना देण्यात आले.

दरम्यान, मनसेचे प्रदेश सरचिटणीस दिलीप धोत्रे व तालुकाध्यक्ष शशिकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या मोर्चात हजारो महिलांचा सहभाग होता़ मनसेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सरकारने मोठमोठ्या उद्योग पतींना कोट्यवधी रुपयांची कर्ज माफ केली आहेत,, महिला बचत गटाची तर खूप छोटे कर्ज आहे ते संपूर्ण माफ होण्यासाठी आपण प्रयत्न करावेत ही नम्र विनंती,, साहेब महिला खूप अडचणीत आहेत, कसलेही काम नाही ,त्यांच्या घरच्या पुरुष मंडळींना देखील काम नाही प्रचंड हलाखीचे जीवन जगत आहेत आणि वरून रोजच मायक्रो फायनान्स गुंडांचा त्रास यामुळे अनेक महिला निराशेचे जीवन जगत आहेत अशातच पंढरपूर येथील मनीषा निकम या महिलेने या गुंडांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली आहे, आशा अनेक महिला आत्महत्या करत आहेत, ,तरी कृपया मायक्रो फायनान्स कंपनीना विम्याचे सर्टिफिकेट देण्यासाठी आदेश द्यावे आणि संपूर्ण वसुली थांबवावी ही विनंती अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा मनसेचे दिलीप धोत्रे यांनी दिला आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरPandharpurपंढरपूरMNSमनसेWomenमहिलाBanking Sectorबँकिंग क्षेत्र