मराठा आरक्षणासाठी आमदार रमेश कदम याचा राजीनामा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2018 19:54 IST2018-07-26T19:53:41+5:302018-07-26T19:54:06+5:30
रमेश कदम यांनी आपला राजीनामा विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे पत्राव्दारे दिला आहे़

मराठा आरक्षणासाठी आमदार रमेश कदम याचा राजीनामा
सोलापूर : मराठा आरक्षणासाठी मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार रमेश कदम यांनी आपला राजीनामा विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे पत्राव्दारे दिला आहे़
आमदार रमेश कदम यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की, संपूर्ण महाराष्ट्रात मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण मिळण्याकरिता आंदोलन व इतर संसदीय मार्गाने या समाजासाठी न्याय मागणी म्हणून आरक्षणाची मागणी होत आहे़
महाराष्ट्र विधानसभेचा सदस्य म्हणून मराठा समाजाला देखील स्वतंत्र आरक्षण मिळून हा समाज देखील विकासाच्या मुख्य प्रवाहात राहिला पाहिजे अशी माझी आग्रही भूमिका असल्याने रमेश कदम यांनी पत्रात नमुद केले आहे़ या समाजाच्या या रास्त मागणीकरिता मी माझ्या मोहोळ, अनुसुचित जातीसाठी राखीव असलेल्या विधानसभा मतदार संघाच्या सदस्यपदाचा स्वखुशीने राजीनामा देत असल्याचे पत्रात नमुद केले आहे़