शहरं
Join us  
Trending Stories
1
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
2
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
3
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
4
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
5
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
6
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
7
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
9
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
10
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
11
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
12
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
13
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
14
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
15
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
16
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
17
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
18
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
19
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
20
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते

लसीकरणाचा टक्का वाढवण्यासाठी मंगळवेढ्यात मिशन युवा स्वास्थचा ॲक्शन प्लॅन तयार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2021 8:26 PM

लसीकरणासाठी नागरिकांचे समुपदेशन

मंगळवेढा : कोरोनावर प्रभावी उपाय म्हणून लसीकरण आवश्यक असून, ग्रामीण भागात लसीकरणाचा टक्का वाढविण्यासाठी नूतन तालुका आरोग्य अधिकारी डॉ भाऊसाहेब जानकर  यांनी अॅक्शन प्लॅन तयार केला. दरम्यान तरुणांचे १०० टक्के लसीकरण पूर्ण होण्यासाठी महाविद्यालयांमध्ये ‘मिशन युवा स्वास्थ्य’मोहीम  २५ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर या दरम्यान हाती घेण्यात आली आहे हे अभियान यशस्वी करण्यासाठी टीएचओ जानकर यांनी जय्यत तयारी केली आहे .

कोरोनाची दुसरी लाट ओसरत असली तरी तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविण्यात येत आहे. कोरोनापासून स्वत:सह कुटुंबीयांना सुरक्षित ठेवण्यासाठी कोरोना प्रतिबंधक लस प्रभावी ठरली आहे. मात्र अजूनही ग्रामीण भागातील काही नागरिक गैरसमज, अफवांवर विश्वास ठेवून लस घेण्यास टाळाटाळ करीत असल्याचे दिसून येते.अशा नागरिकांचे समुपदेशन करणे, लसीकरण शिबिर आयोजित करणे आणि लसीकरण केंद्रांना भेटी देऊन मार्गदर्शन करणे, कृती आराखड्याची अंमलबजावणी सीईओ दिलीप स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली टीएचओ डॉ भाऊसाहेब जानकर यांच्याकडून केली जात आहे.त्यानुसार लसीकरण केंद्रांना भेटी देऊन पात्र नागरिकांचे समुपदेशन केले जात आहे.

 त्यांनी  बोराळे, सलगर, आंधळगाव , भोसे, मरवडे या प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी सह प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक घेतली तसेच काही  लसीकरण केंद्राला भेटी दिल्या. एकही लस न घेणाऱ्यांची नागरिकांची यादी तयार करून १०० टक्के लसीकरणाचे उदिष्ट पूर्ण करण्याच्या सूचना टीएचओ डॉ  भाऊसाहेब जानकर यांनी सर्व कर्मचाऱ्यांना दिल्या. दरम्यान भोसे येथील आठवडी बाजारात जाऊन विक्रेत्यांना, व्यापाऱ्यांना लसीकरणासाठी प्रवृत्त केले. अनेकांना जवळच्या आरोग्य केंद्रात नेऊन लसीकरण करण्यात आले.

......................................मिशन युवा स्वास्थ्य लसीकरण मोहीम--तालुक्यात १ लाख ६५ हजार लसीकरण उद्दिष्ट आहे . आजपर्यंत पहिला डोस ७७ हजार , दुसरा डोस २२ हजार ८४५ नागरिकांनी घेतला आहे यामध्ये मिशन कवच कुंडल यामध्ये १० हजार नागरिकांनी डोस घेतला आहे. ...................................अफवांवर विश्वास ठेऊ नका....ग्रामीण भागात कोरोना प्रतिबंधक लसीसंदर्भात गैरसमज व अफवा असल्याने काही जण लस घेण्यासाठी समोर येत नाही. कुणीही अफवांवर विश्वास न ठेवता लस घ्यावी, मिशन युवा स्वास्थ्य’मोहीम  २५ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर या दरम्यान हाती घेण्यात आली असून तरुणांनी लसीकरणासाठी स्वयंस्फूर्तीने पुढे यावे असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. भाऊसाहेब जानकर यांनी केले आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरHealthआरोग्यCorona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या