प्रेमाच्या जाळ्यात ओढून केलेल्या अत्याचारात अल्पवयीन निर्भया प्रेग्नेंट, सोलापुरातील धक्कादायक घटना  

By विलास जळकोटकर | Updated: September 29, 2023 18:50 IST2023-09-29T18:50:04+5:302023-09-29T18:50:18+5:30

शहरातील एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला कर्नाटकातील नातलगाच्या गावी मजनूनं प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यावर अत्याचार केले.

Minor Nirbhaya Pregnant In Love Trap, Shocking Incident In Solapur | प्रेमाच्या जाळ्यात ओढून केलेल्या अत्याचारात अल्पवयीन निर्भया प्रेग्नेंट, सोलापुरातील धक्कादायक घटना  

प्रेमाच्या जाळ्यात ओढून केलेल्या अत्याचारात अल्पवयीन निर्भया प्रेग्नेंट, सोलापुरातील धक्कादायक घटना  

सोलापूर : शहरातील एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला कर्नाटकातील नातलगाच्या गावी मजनूनं प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यावर अत्याचार केले. यातून ती प्रेग्नेंट राहिल्याची धक्कादायक घटना विजापूर नाका पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. ही घटना मे व जून महिन्यात घडली. आकाश तळकीरी असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. संबंधित गुन्हा कर्नाटकात जडल्याने तेथील पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे.

यातील अल्पवयीन मुलगी सोलापुरातील एका भागात राहते. मे आणि जून महिन्यात ती विजापूर जिल्ह्यातील एका गावात तिच्या नातलगाकडे राहण्यासाठी गेली होती. या काळात त्या गावातील एका तरुणानं तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केले. यामध्ये ती मुलगी चार महिन्याची प्रेग्नेंट राहिल्याचे आढळून आले. या प्रकरणी पिडितेने तिच्या नातेवाईकाला संबंधी प्रकार सांगितल्यानंतर संबंधित तरुणाविरुद्ध विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदला आहे. सदरचा गुन्हा हा विजापूर जिल्ह्यात घडलेला असल्याने पोलिसांनी हा गुन्हा इंडी (जि. विजापूर) पोलीस ठाण्याकडे वर्ग केला आहे.
 

Web Title: Minor Nirbhaya Pregnant In Love Trap, Shocking Incident In Solapur