चोरी केल्याप्रकरणी अल्पवयीन मुलगा ताब्यात; सहा गुन्हे उघडकीस

By रूपेश हेळवे | Updated: August 5, 2023 18:54 IST2023-08-05T18:54:03+5:302023-08-05T18:54:31+5:30

दोन लाख ७७ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. 

minor arrested for theft six crimes were revealed | चोरी केल्याप्रकरणी अल्पवयीन मुलगा ताब्यात; सहा गुन्हे उघडकीस

चोरी केल्याप्रकरणी अल्पवयीन मुलगा ताब्यात; सहा गुन्हे उघडकीस

रूपेश हेळवे, सोलापूर : चोरी केल्याप्रकरणी एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलाला एमआयडीसी पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्याकडून दोन लाख ७७ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. 

एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीत चोरीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले होते. या प्रकरणी आरोपीचा शोध घेत असताना गुन्हे प्रकटीकरण पथकातील सुहास अर्जुन यांना मिळालेल्या माहितीवरून त्यांनी त्या अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले. त्याची विचारपूस केल्यानंतर त्याने शहरातील तीन पोलीस ठाणे हद्दीत चोरी केल्याचे कबूल केले. त्याच्याकडून रोख ५० हजार रुपयांसह ३० ग्राम सोने पोलिसांनी जप्त केले आहेत. ही कारवाई एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजन माने, शिवशंकर बोंदर यांच्या मार्गदर्शनाखाली पोसई विक्रम रजपूत, चेतन रुपनर एकनाथ उबाळे सचिन भांगे मंगेश गायकवाड आदींनी केली.

Web Title: minor arrested for theft six crimes were revealed