शहरं
Join us  
Trending Stories
1
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
4
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
5
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
6
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
7
६ धावांत ४ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
8
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
9
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
10
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
11
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
12
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
13
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
14
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
15
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
16
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
17
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
18
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
19
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
20
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका

मंत्रालय मुंबई शहराबाहेर नेणार : नगरविकास राज्यमंत्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 07, 2018 7:08 PM

पंढरपूर : महाराष्ट्रात शहरीकरण सर्वाधिक वेगाने होत आहे. २०-२५ वर्षे पुढचा विचार केला तर वाढती लोकसंख्या आणि दक्षिण मुंबईमध्ये होणारी गर्दी पाहता भविष्यात कदाचित मंत्रालय देखील मुंबई बाहेर नेले जाईल. गर्दीचे विकेंद्रीकरण व्हावे यासाठी नवी मुंबईजवळ नियोजनबद्ध असे नयना हे नवीन शहर वसविण्याचे काम सुरु करण्यात आले आहे, अशी माहिती ...

ठळक मुद्देमहाराष्ट्रात शहरीकरण सर्वाधिक वेगाने - रणजित पाटील निधी योग्य कामासाठी आणि काळजीनेच खर्च केला जाईल - रणजित पाटील

पंढरपूर : महाराष्ट्रात शहरीकरण सर्वाधिक वेगाने होत आहे. २०-२५ वर्षे पुढचा विचार केला तर वाढती लोकसंख्या आणि दक्षिण मुंबईमध्ये होणारी गर्दी पाहता भविष्यात कदाचित मंत्रालय देखील मुंबई बाहेर नेले जाईल. गर्दीचे विकेंद्रीकरण व्हावे यासाठी नवी मुंबईजवळ नियोजनबद्ध असे नयना हे नवीन शहर वसविण्याचे काम सुरु करण्यात आले आहे, अशी माहिती नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी दिली. 

पंढरपूर येथील नगरपरिषदेच्या वतीने आयोजित विविध विकासकामांच्या शुभारंभ कार्यक्रमासाठी पंढरपुरात आल्यानंतर त्यांनी शासकीय विश्रामगृह येथे पत्रकारांशी संवाद साधला़ यावेळी पालकमंत्री विजयकुमार देशमुख, मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले, आ़ प्रशांत परिचारक, नगराध्यक्षा साधना भोसले, भाजपचे शहराध्यक्ष संजय वाईकर आदी उपस्थित होते. 

डॉ. रणजित पाटील म्हणाले, महाराष्ट्रात शहरीकरण सर्वाधिक वेगाने होत आहे. वाढती लोकसंख्या आणि दक्षिण मुंबईतील गर्दी पाहता भविष्यात कदाचित मंत्रालय मुंबई बाहेर न्यावे लागेल. चंदीगड, नवी मुंबई प्रमाणे नयना नावाचे नवीन शहर देखील वसविण्यात येत आहे. त्याचे काम सुरु झाल्याचेही त्यांनी सांगितले. पंढरपूरचा विकास करताना स्थानिक नागरिकांचा विचार केला जात नाही. पंढरपूर शहरात सुमारे ८१ कोटी रुपये खर्चून ठिकठिकाणी स्वच्छतागृहे बांधण्यात आली आहेत. पण ती वापराअभावी धूळखात पडून आहेत. सध्या घाटाचे काम देखील चुकीच्या पद्धतीने सुरु आहे. भाविकांच्या सामान ठेवण्याची सोय व्हावी, यासाठी बांधण्यात आलेल्या लॉकर रुमही अयोग्य ठिकाणी बांधल्यामुळे त्याचा वापर होत नाही. विकासकामे होत असताना योग्य नियोजन नसल्यामुळे शासनाचा कोट्यवधी रुपयांचा निधी वाया जात आहे, असे अनेक प्रश्न पत्रकारांनी डॉ. पाटील त्यांना विचारले असता त्यांनी शांतपणे ऐकून घेऊन म्हणाले, पंढरपूरच्या इतिहासात कधी नव्हे इतका निधी या चार वर्षांच्या काळात शासनाने पंढरपूरसाठी खास बाब म्हणून दिलेला आहे. पूर्वी केवळ घोषणा होत होत्या; मात्र आता प्रत्यक्ष कामे होत आहेत. ही सर्व कामे होत असताना काही त्रुटी असतील तर त्याची दखल घेऊन निश्चित सुधारणा केल्या जातील. निधी योग्य कामासाठी आणि काळजीनेच खर्च केला जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 

नगरविकास राज्यमंत्री अनभिज्ञ कॅनडा सरकारकडून तीर्थक्षेत्र पंढरपूरच्या विकासासाठी कमी व्याजदराने सुमारे दोन हजार कोटी रुपयांचा निधी मिळविण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात गेल्या आषाढी यात्रेच्या वेळी सुतोवाच केले होते. त्यानंतर श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले यांनी त्यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरु ठेवला आहे. दरम्यान, कॅनडाचे कौन्सिल जनरल जॉर्डन रिव्हज यांनी देखील यासंदर्भात पंढरपूरचा दौरा केला़ पण पुढे काहीच झालेले नाही, याविषयी नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांना प्रश्न विचारल्यानंतर डॉ. पाटील यांनी यासंदर्भात आपल्याला माहिती नसल्याचे सांगून अनभिज्ञता व्यक्त केली. 

टॅग्स :SolapurसोलापूरMantralayaमंत्रालयMumbaiमुंबई