शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

मंत्री नितेश राणे यांच्या ताफ्याला दाखवले चक्क कोंबड्यांचे फोटो; सोलापूर दौऱ्यावेळी गोंधळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2025 10:29 IST

अचानक झालेल्या आंदोलनामुळे विमानतळ परिसरात बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. 

BJP Nitesh Rane : भाजप नेते आणि राज्याचे मत्सव्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्या सोलापूर दौऱ्यावेळी काहीसा गोंधळ उडाल्याचं पाहायला मिळालं. नितेश राणे यांचे सोलापुरात स्वागत करण्यासाठी भाजप कार्यकर्त्यांनी सात रस्ता परिसरात लावलेले डिजिटल फलक महापालिकेने गुरुवारी हटवले. तर दुसरीकडे, विमानतळाच्या बाहेर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी कोंबड्यांचे फोटो दाखवत निषेध केला.

अक्कलकोट तालुक्यातील सभेसाठी मंत्री नितेश राणे यांचे गुरुवारी सायंकाळी होटगी रोड विमानतळावर आगमन झाले. विमानतळाबाहेर पोलिस बंदोबस्त होता. मात्र यादरम्यान, उद्धवसेनेचे उपशहरप्रमुख संतोष घोडके, विकी खंडागळे, किरण मिश्रा, प्रदीप गायकवाड यांनी राणेंचा ताफा जात असताना फोटो दाखवत निषेधाच्या घोषणा दिल्या. तोपर्यंत ताफा निघून गेला. विजापूर नाका पोलिसांनी चौघांना पोलिस ठाण्यात बोलावून घेतले. प्रतिबंधात्मक कारवाईची नोटीस दिल्याचे घोडके यांनी सांगितले. अचानक झालेल्या आंदोलनामुळे विमानतळ परिसरात बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. 

दरम्यान, "आम्ही आंदोलन केले. निषेध म्हणून काळे झेंडे दाखवलेले नाहीत. कोंबड्यांचे फोटो दाखवणे हा काही गुन्हा होत नाही. तरीही आम्हाला पोलिसांनी बोलावून घेतले. आम्ही पोलिसांना सहकार्य करणार आहोत," असं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपशहरप्रमुख संतोष घोडके यांनी म्हटलं आहे.

टॅग्स :Nitesh Raneनीतेश राणे SolapurसोलापूरBJPभाजपाShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरे