सोलापूरातील एमआयएमच्या नगरसेवकाच्या खाजगी बॉडीगार्डने काँग्रेस कार्यकर्त्यावर पिस्तुल रोखून केली दमदाटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2018 14:27 IST2018-10-12T14:20:23+5:302018-10-12T14:27:55+5:30

सोलापूरातील एमआयएमच्या नगरसेवकाच्या खाजगी बॉडीगार्डने काँग्रेस कार्यकर्त्यावर पिस्तुल रोखून केली दमदाटी
सोलापूर : सामाजिक कार्यकर्ते शौकत पठाण हे दुपारी बाराच्या सुमारास सोलापूर महानगरपालिकेच्या सभागृहाबाहेर थांबले असता एमआयएमचे स्वीकृत नगरसेवक गाजी इस्माईल सादिक जहागीरदार हे आपल्या खाजगी बॉडीगार्ड व कार्यकर्त्यासमवेत तेथे आले त्यावेळी त्यांनी शिवीगाळ करून दमदाटी केली. त्याच्यासोबत असलेल्या खाजगी बॉडीगार्डने जवळील पिस्तुल बाहेर काढून शौकत पठाण यांच्या दिशेने रोखली.
प्रभागातील विकास कामाबाबत तू अधिकाºयांना सारखा फोन का करतोस असा जाब विचारत गादी जहागीरदार यांनी शिवीगाळ केली. त्याच्यासोबत असलेल्या खाजगी बॉडीगार्डने जवळील पिस्तुल बाहेर काढून शौकत पठाण यांच्या दिशेने रोखली अशी माहिती शौकत पठाण यांनी लोकमत शी बोलताना दिली़ गादी जहागीरदार यांच्याविरुद्ध तक्रार देण्यासाठी शौकत पठाण रेल्वे पोलीस चौकी येथे पोहोचले आहेत.
काँग्रेसच्या कार्यकर्ते शौकत पठाण यांच्यावर एमआयएमचे नगरसेवक जहागीरदार यांच्या बॉडीगार्डने पिस्तुल रोखल्याचा आरोप करण्यात आला आहे़ याप्रकरणी नगरसेवक जहागीरदार यांच्या बॉडीगार्डवर गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी नगरसेविका फिरदोस पटेल, शौकत पठाण यांच्यासह कार्यकर्त्यांनी रेल्वे स्टेशन पोलीस चौकीत ठिय्या मारला.