MIDC टॉवेल कारखान्याला आग; अग्निशमन दलाच्या दहा गाड्या घटनास्थळी
By Appasaheb.patil | Updated: February 22, 2023 16:58 IST2023-02-22T16:56:53+5:302023-02-22T16:58:18+5:30
हवेत दिसले आगीचे लोट, अक्कलकोट रोडवरील घटना

MIDC टॉवेल कारखान्याला आग; अग्निशमन दलाच्या दहा गाड्या घटनास्थळी
आप्पासाहेब पाटील, सोलापूर: शहरातील अक्कलकोट एमआयडीसी परिसरात असलेल्या एका टॉवेल कारखान्याला आग लागली आहे. आगीचे लोट मोठ्या प्रमाणात बाहेर पडत आहे. आग विझवण्यासाठी अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाले आहेत. लक्ष्मीनारायण टाॅकीजसमोरील जुना बालाजी स्पिनिंग मिल सध्या गोडाऊनला भाडयाने देण्यात आले आहे. बुधवारी सुट्टीच्या दिवशी दुपारी साडे तीनच्या सुमारास आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
दरम्यान, आग भयंकर लागली आहे. लहान- लहान सिलेंडर स्फोट होत आहेत. घटनास्थळी आत्ता पाण्याच्या दोन गाड्या आल्या आहेत, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी आहेत. लोकांची मोठी गर्दी असून बचाव कार्य धावपळ करून करत आहेत. कारखाना टॉवेलचा आहे.