व्यापाऱ्यांनी दुकाने उघडली, पोलिसांनी हस्तक्षेप करीत बंद केली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:22 IST2021-04-11T04:22:10+5:302021-04-11T04:22:10+5:30
शहरातील दुकाने उघडत असल्याचे पोलिसांना कळातच उत्तर पोलीस ठाण्याचे अधिकारी, कर्मचाऱ्यानी संपूर्ण शहरात पथकाद्वारे फेरफटका मारला. दरम्यान व्यापाऱ्यांना सांगत ...

व्यापाऱ्यांनी दुकाने उघडली, पोलिसांनी हस्तक्षेप करीत बंद केली
शहरातील दुकाने उघडत असल्याचे पोलिसांना कळातच उत्तर पोलीस ठाण्याचे अधिकारी, कर्मचाऱ्यानी संपूर्ण शहरात पथकाद्वारे फेरफटका मारला. दरम्यान व्यापाऱ्यांना सांगत दुकान बंद करण्यास सांगितले. त्यानंतर शहरातील दुकाने बंद झाली. परंतु नगरपालिकेचे कुणीच अधिकारी, कर्मचारी फिरकले नाहीत. यामुळे काय बंद, काय चालू यावर पोलीस व व्यापारी यांच्यात वादविवाद झाला. याप्रसंगी नगरपालिका कर्मचारी असणे आवश्यक होते. तसे झाले नाही
यामुळे पोलीस कर्मचाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. तसेच काही दुकाने बंद असूनही त्या समोर विनाकारण घोळका करून बसलेल्यांना पोलीस काठी दाखवताच त्यांनी घरचा रस्ता धरला.
याउलट ग्रामीण भागात तडवळ, मैंदर्गी, दुधनी, करजगी, नागणसूर, तोलणूर, चप्पळगाव, शिरवळ, वागदरी, जेऊर यासह अनेक ठिकाणी दुकानदारांनी आपली दुकाने बंद ठेवून प्रतिसाद दिला. यासाठी दक्षिण पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी दिवसभर गावोगावी भेटी देऊन सूचना केल्या.
फोटो
१०अक्कलकोट
ओळी
अक्कलकोट शहरात सकाळी व्यापाऱ्यांनी दुकाने उघडताच पोलिसांनी सूचना करीत ते बंद करण्यास भाग पाडले.