शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

मास्तर तुम्हीसुद्धा... जुगार खेळताना ZP शिक्षकासह चौघांना रंगेहाथ पकडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2022 14:36 IST

सोलापूर - मंगळवेढा तालुक्यातील कचरेवाडी येथे जुगार अड्ड्यावर टाकलेल्या छाप्यात एका झेडपी शिक्षकासह 4 जणांना रंगेहाथ पकडण्यात आले. तर, इतर ...

सोलापूर - मंगळवेढा तालुक्यातील कचरेवाडी येथे जुगार अड्ड्यावर टाकलेल्या छाप्यात एका झेडपी शिक्षकासह 4 जणांना रंगेहाथ पकडण्यात आले. तर, इतर 5 जणांनी धूम ठोकली. याप्रकरणी 9 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पळून जाणाऱ्यांची नावे निष्पन्न झाली आहेत. या कारवाईत 2 लाख 7 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 

पोलीस निरीक्षक रणजित माने यांच्या पथकाला मिळालेल्या माहितीनुसार, कचरेवाडी येथे दिलीप रामचंद्र मेटकरी यांच्या घरासामोर पाटबंधारे विभागाच्या जागेत काही लोक पत्त्याच्या पानावर पैसे लावून जुगार खेळत असल्याने तेथे छापा टाकला. यावेळी तेथे काही लोक जुगार खेळताना मिळून आले. यामध्ये दिलीप रामचंद्र मेटकरी (वय ६४), दत्तात्रय श्रीमंत आवळेकर (वय ४२), दत्तात्रय अंकुश माने, सीताराम मोहन फटे (वय ५४, सर्व रा. कचरेवाडी, ता. मंगळवेढा) यांना जागीच पकडले. तसेच पळून गेलेल्यांमध्ये उमेश उत्तम गवळी (रा. भालेवाडी), बबलू सीताराम शिंदे, लाला काळुंगे, महीपती अंकुश माने, पिंटू माने (सर्व रा. कचरेवाडी) यांचा समावेश आहे. त्यांच्यासमोर पत्त्याची पाने, रोख १५ हजार ५५० रुपये, चार मोटारसायकली व तीन मोबाईल असा २ लाख ७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल मिळून आला.

सदरची कामगिरी एसपी तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मतराव जाधव, डीवायएसपी राजश्री पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रणजित माने, सहायक पोलीस निरीक्षक आमोल बामणे, उपनिरीक्षक विजय वाघमारे, पोहेकॉ. महेश कोळी, पो.ना. विठ्ठल कोळी, पो.कॉ. सोमनाथ माने, पोकॉ मळसिद्ध कोळी व चालक पो.काॅ. समाधान यादव यांनी केली.

टॅग्स :SolapurसोलापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसTeacherशिक्षक