मंगळवेढ्यातील मॉलला भीषण आग; पाच किलोमीटर परिसरात धुराचे लोट

By रवींद्र देशमुख | Updated: September 8, 2023 10:15 IST2023-09-08T10:12:54+5:302023-09-08T10:15:33+5:30

आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी दाखल झाली असून आग विझविण्याचे प्रयत्न मोठे प्रमाणावर सुरू आहेत.

Massive fire at mall in Mangalvedha; A plume of smoke in a five kilometer area | मंगळवेढ्यातील मॉलला भीषण आग; पाच किलोमीटर परिसरात धुराचे लोट

मंगळवेढ्यातील मॉलला भीषण आग; पाच किलोमीटर परिसरात धुराचे लोट

सोलापूर : मंगळवेढा शहरातील खटावकर मॉलला शुक्रवारी सकाळी 8 च्या सुमारास भीषण आग लागली असून मॉलच्या वरील मजल्यावरून धुराचे लोळ पाच किलोमीटर परिसरात पसरले आहे. आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी दाखल झाली असून आग विझविण्याचे प्रयत्न मोठे प्रमाणावर सुरू आहेत.

ही आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. खटावकर मॉल मध्ये किराणा, जनरल स्टोअर, इलेक्ट्रिक, कपडे, चप्पल आदी सर्व प्रकारचे साहित्य मॉल मध्ये विक्रीसाठी आहे. आज सकाळी मॉल बंद होता. सकाळी 8 च्या सुमारास अचानक मॉलच्या वरील मजल्यावरून धूर येत असल्याचे परिसरातील नागरिकांच्या लक्षात आले.  

काही वेळेतच अग्निशमन दलाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. त्यामुळे अग्निशमन दलाचे बंब नेण्यास कर्मचाऱ्यांना अडचण येत असल्याने पोलिसांनी गर्दी पांगविली. घटनास्थळी आयपीएस अधिकारी नयोमी साटम, उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड आदी अधिकाऱ्यांनी भेट दिली आहे.

Web Title: Massive fire at mall in Mangalvedha; A plume of smoke in a five kilometer area