सासरच्या जाचाला कंटाळून तांदूळवाडीत विवाहितेची आत्महत्या

By काशिनाथ वाघमारे | Updated: February 19, 2024 20:31 IST2024-02-19T20:30:58+5:302024-02-19T20:31:21+5:30

चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Married woman commits suicide in Tandulwadi after getting tired of her father-in-law's interrogation | सासरच्या जाचाला कंटाळून तांदूळवाडीत विवाहितेची आत्महत्या

सासरच्या जाचाला कंटाळून तांदूळवाडीत विवाहितेची आत्महत्या

काशिनाथ वाघमारे, सोलापूर: सासरच्या जाचाला कंटाळून माळशिरस तालुक्यात तांदूळवाडी येथे अनिता सचिन सुरवसे (वय २३) या विवाहितेने रविवारी दुपारी विहिरीत उडी ठोकून आत्महत्या केली. सायंकाळी उशीरा हा प्रकार निदर्शनास आला. याप्रकरणी वेळापूर पोलिसांनी नवरा, सासू, दोन नंदा आशा चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत अनिताचे वडील अर्जुन सुखदेव माने (रा. दसूर) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिस सूत्राकडील माहितीनुसार अनिता हिचे लग्नानंतर एक वर्षातच वाहनासाठी पैसे आणावेत आणि दोन मुलीच आहेत, मुलगा हवा म्हणत दवाखान्याचा खर्च आण म्हणून सासरच्या लोकांनी त्रास द्यायला सुरुवात केली. या त्रासास कंटाळून घराजवळील विहिरीत उडी मारून तिने आत्महत्या केल्याचे तिच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी पोलिसांनी पती सचिन पांडुरंग सुरवसे, सासू कोंडाबाई पांडुरंग सुरवसे, नणंद शुभांगी राजेंद्र भोसले (रा. धायटी), नणंद पाली दत्तात्रय महाकाळ (रा. वासूद अकोले) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून गुन्ह्यातील चारही आरोपींना अटक करून माळशिरस येथील न्यायालयात हजर केले असता २१ फेब्रुवारी पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. पुढील तपास वेळापूर पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी भाऊसाहेब गोसावी करीत आहेत.
---
पतीकडून मिसिंग दाखल
तिने आत्महत्या केल्याचे उघड होण्यापूर्वी पत्नी अनिता ही बेपत्ता झाल्याबाबत मिसिंग वेळापूर पोलिस स्टेशनला दाखल झाली होती. ही मिसिंग १५ फेब्रुवारी रोजी पती सचिन सुरवसे याने दिली होती.

Web Title: Married woman commits suicide in Tandulwadi after getting tired of her father-in-law's interrogation